अब्दूल वहाब यांना सेवानिवृत्तीबद्दल निरोप
गोकुंदा ( किनवट ) :
येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातून नियत वयोमानाने सेवानिवृत्तीबद्दल सेवक अब्दुल वहाब शेख करीम यांना विशेष कार्यक्रमात निरोप देण्यात आला.
संस्था सचिव अभियंता प्रशांत ठमके निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य राजाराम वाघमारे , उपप्राचार्य सुभाष राऊत , पर्यवेक्षक शेख हैदर , निवृत्त लिपिक लक्ष्मीकांत दासरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकातून प्राचार्य राजाराम वाघमारे यांनी अ. वहाब यांच्या २८ वर्षाच्या प्रदीघ सेवाकाळातील कार्याचा गौरव केला. शेख हैदर यांनीही मनोगत व्यक्त केले . संस्था , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी भेटवस्तू देऊन अ. वहाब यांना सन्मानपूर्वक निरोप दिला. अ. वहाब यांनी निरोपाला समर्पक उत्तर दिले . अध्यक्षीय समारोप करतांना अभियंता प्रशांत ठमके यांनी त्यांच्या सेवाकाळातील कौशल्याची प्रशंशा केली. पर्यवेक्षक डॉ. महेंद्र नरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. बंडू भाटशंकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment