वझरा (शे.फ.) येथे नवस फेडण्यासाठी आलेले पंचविस जण अपघातात गंभीर जखमी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, May 9, 2019

वझरा (शे.फ.) येथे नवस फेडण्यासाठी आलेले पंचविस जण अपघातात गंभीर जखमी

वझरा (शे.फ.) येथे नवस फेडण्यासाठी आलेले पंचविस जण अपघातात गंभीर जखमी    


वझरा ( शेख फरीद ) ता. माहूर :
माहूर तालुक्यातील वझरा ( शेख फरीद ) येथील शेख फरिदबाबा दर्गाह येथे नवस फेडण्याकरिता जाणाऱ्या वाहनाला दत्तमांजरी घाटात गुरुवारी ( ता. ९ ) सकाळी साडेनऊ वाजता अपघात झाला. यात  गंभीर जखमी झालेल्या पंचेवीस जणांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत.
         याबाबत सविस्तर वृत्त असे की यवतमाळ जिल्ह्यातील ईचोरा ता. आर्णी जि. येथील भाविक माहूर जवळील शेख फरिदबाबा दर्गाह येथे नवस फेडण्याकरिता बोलेरो टॅम्पो वाहनाने जात होते. दत्तमांजरी घाटात चालकाचे वाहनावरिल नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला खोल दरित बोलेरो उलटली. या अपघातात महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक, बालकासह सुमारे पंचविस जन गंभीर जखमी झाले.
          गंभीर जखमींना श्री रेणूकादेवी संस्थानची रूग्णवाहीका तसेच खाजगी वाहनातून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमीवर प्राथमिक उपचार करून दहा अत्यंत गंभीर जखमी भाविकांना पुढील उपचारा करिता यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.घटनेची माहीती मिळताच पोलीस निरिक्षक लक्ष्मण राख, पोलीस उपनिरिक्षक श बोडखे, पोलीस कर्मचारी शारदासुत खामनकर यांनी भेट देऊन जखमींची चौकशी केली.
          अंधश्रध्देपोटी अनेक भावीक याठिकाणी येऊन नवस फेडण्यासाठी बकऱ्याचा बळी देतात. अत्यंत अवघड वळणाच्या घाट रस्त्यावरून वझरा ( शे. फ. ) येथे ये -जा कराव लागते.  येथे येणाऱ्या भाविकांच्या अनेक वाहनांना अपघात झालेला आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News