नांदेड, ता. ९ ऑक्टोबर : नांदेड जिल्हा परिषद व तिच्या अंतर्गत असलेल्या १६ पंचायत समित्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सोमवार तारीख १३ ऑक्टोबर २०२५ रोजी या सोडत जाहिर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रांनुक्रम नियम, २०२५ नुसार ही सोडत घेण्यात येत आहे.
या नियमांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने विशेष सभा आयोजित केली आहे.
अ.क्र. | जिल्हा परिषदेचे नाव/पंचायत समितीचे नाव | सभेचे ठिकाण | सभेची वेळ व तारीख |
1 | नांदेड जिल्हा परिषद, नांदेड | सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड | सकाळी-11.00 वा. तारीख 13/10/2025 |
2 | पंचायत समिती, किनवट | सभागृह, तहसिल कार्यालय, किनवट | सकाळी-11.00 वा. तारीख 13/10/2025 |
3 | पंचायत समिती, माहुर | कै. वसंतराव नाईक सभागृह, पंचायत समिती, माहुर | दुपारी-03.00 वा. तारीख 13/10/2025 |
4 | पंचायत समिती, हदगांव | पंचायत समिती सभागृह, तहसिल कार्यालय, हदगांव | सकाळी-11.00 वा. तारीख 13/10/2025 |
5 | पंचायत समिती, हिमायतनगर | सभागृह, तहसिल कार्यालय, हिमायतनगर | दुपारी-03.00 वा. तारीख 13/10/2025 |
6 | पंचायत समिती, नांदेड | उपविभागीय अधिकारी, नांदेड यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला, तहसिल कार्यालय, नांदेड | सकाळी-11.00 वा. तारीख 13/10/2025 |
7 | पंचायत समिती, अर्धापूर | सभागृह, तहसिल कार्यालय, अर्धापूर | दुपारी-03.00 वा. तारीख 13/10/2025 |
8 | पंचायत समिती, भोकर | उपविभागीय अधिकारी, भोकर यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला, तहसिल कार्यालय, भोकर | सकाळी-11.00 वा. तारीख 13/10/2025 |
9 | पंचायत समिती, मुदखेड | सभागृह, तहसिल कार्यालय, मुदखेड | दुपारी-03.00 वा. तारीख 13/10/2025 |
10 | पंचायत समिती, धर्माबाद | बैठक कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय, धर्माबाद | सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025 |
11 | पंचायत समिती, उमरी | तहसिल सभागृह (नवीन), तहसिल कार्यालय, उमरी | दुपारी-03.00 वा. तारीख 13/10/2025 |
12 | पंचायत समिती, बिलोली | पंचायत समिती सभागृह, बिलोली ता. बिलोली | सकाळी-11.00 वा. तारीख 13/10/2025 |
13 | पंचायत समिती, नायगांव खै. | तहसिल कार्यालय, नायगाव खै. | दुपारी-03.00 वा. तारीख 13/10/2025 |
14 | पंचायत समिती, कंधार | सभागृह, तळमजला, तहसिल कार्यालय, कंधार | सकाळी-11.00 वा. तारीख 13/10/2025 |
15 | पंचायत समिती, लोहा | तहसिल कार्यालय, लोहा | दुपारी-03.00 वा. तारीख 13/10/2025 |
16 | पंचायत समिती, देगलूर | पंचायत समिती सभागृह, तहसिल कार्यालय, देगलूर | सकाळी-11.00 वा. तारीख 13/10/2025 |
17 | पंचायत समिती, मुखेड | बैठक कक्ष, तहसिल कार्यालय, मुखेड | दुपारी-03.00 वा. तारीख 13/10/2025 |
याकरिता सोडत पद्धतीने कारवाई करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली असून, संबंधित अधिकारी, प्रतिनिधी आणि जनतेने या सोडतीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे




No comments:
Post a Comment