नांदेड : बुधवारी (ता.८ ऑक्टोबर ) पहाटे २: ४० वाजता ची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीवायएफआय युवक संघटन आणि सीटू कामगार संघटनेच्या उपोषणार्थींच्या टेंटमध्ये भलामोठा विषारी साप (डोम्या नाग) आला. यावेळी उपोषणार्थी गाढ झोपेत होते. एक उपोषणार्थी जागा असल्यामुळे तो विषारी साप त्याच्या निदर्शनास आला आणि पुढील अनर्थ टळला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा खच भरलेला आहे. अतिवृष्टी आणि इतर प्रश्नावर अनेक उपोषणार्थी तळ ठोकून आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडण्याच्या मुख्य प्रवेश द्वारा जवळ डीवायएफआय युवक संघटनेचे आणि सीटू कामगार संघटनेचे उपोषण सुरु आहे.
घरकुल घोटाळा, आरडीसी यांच्या चपराश्याची हाकालपट्टी करावी, वझरा शेख फरीद येथे पेसा ग्रामपंचायतच्या ग्राम सभेच्या ठरावा नुसार प्लॉट पाडून देऊन घरकुल साठी ५ लक्ष रुपये मंजूर करावेत. नांदेड रेल्वे स्टेशन येथील रेल्वे पोलिसांनी विद्यार्थ्यांस हातकडी लावून ५ तास डांबून ठेऊन ५ हजार रुपये फोन पे द्वारे बळजबरीने घेऊन सोडून दिले त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी. पूरग्रस्तांच्या घरी जाऊन गृहपाहणी करावी किंवा सीटूच्या वतीने मोर्चे काढून सादर केलेल्या यादीतील पूरग्रस्तांचे नावे २०२५ च्या अनुदान पात्र यादीत समाविष्ट करावेत. या मागण्यासाह इतरही मागण्यासाठी उपोषण सुरु आहे.
साखर झोपेत असताना पाऊणेतीन वाजता भलामोठा विषारी साप (डोम्या नाग) उपोषणार्थींच्या टेंट मध्ये आला. एक उपोषणार्थी जागा असल्यामुळे तो विषारी साप त्याच्या निदर्शनास आला आणि अनर्थ टळला म्हणून बरे झाले अन्यथा अनुचित प्रकार निश्चितपणे घडला असता.
विकसित भारत देशात सद्या अमृतकाळ आणि सुवर्ण युग चालू असल्याच्या बाता मारल्या जात आहेत आणि येथे रास्त मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी दीड दीड वर्षे साखळी उपोषण करावे लागत आहेत. ही खूपच गंभीर बाब आहे.त्या विषारी सापापेक्षाही विषारी सरकारची धोरणे आहेत.
-कॉ.गंगाधर गायकवाड,
सेक्रेटरी,माकप नांदेड




No comments:
Post a Comment