घोटी (ता. किनवट ) : येथील रहिवाशी तथा पंचायत समिती किनवटचे कक्ष अधिकारी सुभाष गंगाराम पाटील ( वय ५६ वर्षे ) यांचे सोमवारी ( ता. ३ ) सायंकाळी साडेसहा ते सात वाजताच्या दरम्यान किनवटवरून घोटीकडे मोटारसायकलने जातांना इंडेन गॅस गोडाऊन जवळ अपघातात निधन झाले. ते जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे किनवट तालुकाध्यक्ष होते.
त्यांच्या पश्चात सहचारिणी , तीन मुलगे , एक मुलगी, आई, बहीण व सुना असा परिवार आहे . मंगळवारी ( ता. ४ ) दुपारनंतर घोटी येथील त्यांच्या घराशेजारील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विद्यार्थी दशेपासूनच त्यांना नेतृत्व करण्याची आवड होती . त्यांनी एसएफआयमध्ये सुध्दा काम केले होते . नामांतर आंदोलनातही ते सक्रीय होते. घोटी ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले होते. या कार्यकाळातील त्यांंचे सहकारी सरपंच गुणवंत मेश्राम यांचेही काही वर्षापूर्वी असेच मोटारसायकल अपघातात निधन झाले होते.
जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहायक पदावर प्रथम ते रुजू झाले होते. सेवांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एक -एक पदोन्नती घेच-घेत ते पंचायत समितीचे कक्ष अधिकारी झाले होते.
No comments:
Post a Comment