अकोला :
अकोला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीने रमाई विकलांग योजनेअंतर्गत ५०% पेक्षा जास्त विकलांग असलेल्या महिलांना दरमहा १ हजार रुपये दरमहा पेंशन देण्याचा क्रांतिकारी निर्णय मंगळवारी ( ता. ४ ) ठरावास मंजूरी देऊन घेतला. तसेच या पेंशन योजनेसाठी २९ लाख रुपयांच्या तरतूदीस मंजूरी दिली आहे.
लवकरच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ही योजना मंजूर होवून लाभार्थी निवडण्यात येतील. अशी माहिती आज अकोल्यात पत्रकार परिषदेत देण्यात आली. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी ह्या अनोख्या उपक्रमाची आखणी केली आहे. यामुळे अकोला जिल्हा परिषद विकलांग महिलांना मदत करणारा अभिनव उपक्रम राबविणारी देशातील पहिली ठरणार आहे !
No comments:
Post a Comment