दहावी परिक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा सेमी इंग्रजीचा निकाल 98.13 % - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 10, 2019

दहावी परिक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा सेमी इंग्रजीचा निकाल 98.13 %


गोकुंदा ता. किनवट ( शब्दांजली कानिंदे ) :
येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा इयत्ता दहावीचा  सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल .98.13 % टक्के व एकूण निकाल 82.17 % लागला असून  निकालाची आपली उज्वल परंपरा या विद्यालयाने यावर्षीही कायम ठेवली आहे. या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
           लातूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी /मार्च 2019 परीक्षेसाठी एकूण 404 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी 332 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सेमी इंग्रजीचे प्रविष्ठ 214 पैकी 210 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यामध्ये 90 व प्रथम श्रेणीत 131 विद्यार्थी आहेत.  विशेष प्राविण्यातील गुणानुक्रमे विद्यार्थी असे ( कंसात टक्केवारी ) : आयुष नामदेव ढवळे (95.80 ), क्रांती रमेश महामुने ( 94.80 ) , आदिती बाबू मुंडकर (94 ) , करण रमेश पवार (94 ) , सृष्टी वसंत मडावी (93.40), तुषार विठ्ठल जंगले (93.20), श्रुती कैलास अग्रवाल (93), श्रुती रामदास ठाले (92.60), नेहा देविदास येरवाळ ( 92.20 ) , वैष्णवी नामदेव कुंभार ( 91.80), शुभांगी सुरेश पाटील (91.80 ) , मृणाल मनोज राठोड ( 91.40 ) , शरणम  सोमा पाटील (91.40), शरयु विजय पवार (90. 80 ) , स्नेहल संतोष पेटकुले (90.60 ), जान्हवी अशोक राठोड (90.60 ) , नवोदित गणेश पाटील (90. 40 ), श्रीज्ञा मुरलीधर पोपुलवाड ( 90.20 ) व प्रथमेश संतोष पेटकुले (90 ) .
            या घवघवीत यश पटकाविणाऱ्या यशवंतांचे मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाच सचिव अभियंता प्रशांत ठमके , कोषाध्यक्ष प्राचार्य शुभांगी ठमके, प्राचार्य राजाराम वाघमारे, उपमुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक शेख हैदर, डॉ. महेंद्र नरवाडे , किशोर डांगे, अंबादास जुनगरे, प्रज्ञा पाटील, प्रफुल्ल डवरे ,सुरेश इटके पेललीवार, मनोज भोयर व अशोक भरणे आदींसह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
         

एमकेटी इंग्लिश मेडियम शाळेचा निकाल 90 %


         मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गोकुंदा संचलित इंग्लिश मीडियम माध्यमिक विद्यालय कोठारी (चिखली ) या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 90 टक्के लागला आहे.
         यात विशेष प्राविण्यात एक व प्रथम श्रेणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणानुक्रमे विद्यार्थी असे (कंसात टक्केवारी) : श्रद्धा अनिल मोरे (90.20),आशिष मुकुंदराव जाधव (68.40) , सुमेधा रविकांत नंदनवरे (67.80) , आकाश प्रल्हाद कवडे (66.60), शाबाज अब्दुल शफी खिच्ची (64.60)
         तसेच याच संस्थेच्या मातोश्री कमलताई ठमके माध्यमिक विद्यालय, सुभाषनगर, किनवट या शाळेचा  दहावीचा निकाल 52.30 टक्के लागला आहे. विशेष प्रावीण्यात एक व प्रथम श्रेणीत 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणानुक्रमे विद्यार्थी असे (कंसात टक्केवारी ) : अश्विनी दिलीप जाधव (82.80 ) ,चेतन बंडु राठोड (74 ) , साक्षी शंकर गायकवाड (73. 20 ), शेख समीर महेमूद ( 72.80 ) , नीलम केशव उदे (72. 20 ), वैष्णवी अरविंद कुरमेलकर (72.20 ) .
          या गुणवंत विद्यार्थ्यांचे मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके ,सचिव प्राचार्या शुभांगी ठमके, मुख्याध्यापक देवेंद्र दुबे, मुख्याध्यापक शाम बागनवार आदींसह सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News