प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मृतीदिनी प्रसिद्ध कवि प्रा.नंदू वानखडे यांनी जागवल्या आठवणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 23, 2019

प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मृतीदिनी प्रसिद्ध कवि प्रा.नंदू वानखडे यांनी जागवल्या आठवणी



वाशीम :
महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक स्मृतिशेष प्रल्हाद शिंदे यांचे सोबत काही गाण्याचे निर्मिती रेकाॅर्डींग करतांना संधी मिळाली माझ्या ' भीम लाखातला हिरा '' या कॅसेट साठी प्रल्हाद दादांनी माझी गाणी गायिली...
पुण्यात 2002 मध्ये ते माझ्या खोलीमध्ये आठ दिवस मुक्कामाला होते..अनेक गाणे मी त्यांना दिली काही गाण्याचे रेकाॅर्डींग माझी काही लोक गीत त्यांनी विविध स्टेजवर गायिली...
रात्री ब-याच वेळापर्यंत विविध गाण्याची रियाज तालिम ते करित असत...अनेकदा वाजवता वाजवता त्यांना डुलकी यायची तरीही पेटीचे सूर ते व्यवस्थित वाजवायचे....
प्रत्येक गाण्याच सोनं करण्याची कला ताकद त्यांच्या गळ्यात होती...विलक्षण प्रभावी पहाडी गळ्याची देण असलेला हा गायक फार विनोदी स्वभावाचा होताच..तितकाच कडक स्वभावाचाही होता....
अस्सल गळ्याचे गायक प्रल्हाद शिंदे दादा आपल्यातून निघून गेले असले तरी दररोज त्यांच्या गाण्यानं खेड्या शहरातली सकाळ ऊगवत असते..
गजबजून जात असते...
अशा महान गायकाच्या स्मृती दिना निमित्य विनम्र अभिवादन...!!
23:जून...
  ----प्रा.नंदू वानखडे ,
मुंगळा जि.वाशिम-'9423650468..

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News