नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी द्वारे प्रसारीत आणि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रांवर उत्पादीत करण्यात आलेल्या प्रमुख पीकांचे बियाणे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र येथे उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील व परिसरातील शेतक-यांची परभणी येथून बियाणे आणण्याची गैरसोय टळणार आहे.
कापूस संशोधन केंद्र येथे उपलब्ध करण्यात आलेले बियाणे, वाण, पिशवीचे वजन आणि त्याची किंमत खालीलप्रमाणे आहे.१. सोयाबीन : एमएयूएस १६२ (२६ किग्रा) रु. २०८०-
२. तूर : बीएसएमआर ७३६ - लाल (६ किग्रा) रु. ७८०/-
तूर : बीडीएन ७१६ - लाल (६ किग्रा) रु. ७८०/-
तूर : बीडीएन ७११ - पांढरा (६ किग्रा) रु. ७८०/-
३. मूग : बीएम २००३-२ (६ किग्रा) रु. ७८०/-
४. ज्वारी : परभणी शक्ती (४ किग्रा) रु. २४०/-
वरील पैकी सोयाबीनचा एमएयूएस १६२ हा वाण उंच वाढणारा असून कंबाईन हारवेस्टरद्वारे कापणी व मळणीसाठी सुयोग्य वाण आहे. तुरीचा बीडीएन ७११ हा वाण १५०-१५५ दिवसामध्ये तयार होणारा असल्यामुळे कोरडवाहू लागवडीसाठी फायदेशीर आहे. ज्वारीच्या परभणी शक्ती या वाणामध्ये लोह व जस्ताचे प्रमाण अधिक असल्यामुळे बालके व गर्भवती महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
वरीलपैकी बियाण्याची दि. २२ जून २०१९ पासून कापूस संशोधन केंद्र, बाफना टी पोईंट, देगलूर रोड, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत विक्री करण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरीता ७५८८५८१७२१, ९४२१५६९०१८ किंवा ९०७५८७०२२७ या फोनवर संपर्क करावा असे अवाहन कापूस विशेषज्ञ डा. के. एस. बेग यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment