नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा नदीच्या दोन्ही थडीवरील भागात भूकंपाचे सौम्य धक्के ; सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 22, 2019

नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा नदीच्या दोन्ही थडीवरील भागात भूकंपाचे सौम्य धक्के ; सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



किनवट .
नांदेड व यवतमाळ जिल्ह्याची सीमा असलेल्या पैंनगंगा नदीच्या दोन्ही थडीवरील भागात शुक्रवारी (ता. २१) रात्री ९ वाजून १० मिनीटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले असून घाबरण्याची गरज नसुन सतर्क राहण्याचे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. ; तर नागरिकांनी कोणत्याही आफवेवर विश्वास ठेऊ नये असे नांदेडचे  जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी कळविले आहे.

           नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहुर तालुक्यासह जिल्यात अनेक ठिकाणी शुक्रवारी ( ता. २१ ) रात्री ९.१० वाजता  भूकंपाच्या धक्यासह जोरदार आवाज होताच नागरिक घराबाहेर पडले. नागरीक भयभीत झाल्याचा संदेश सर्वत्र पसरल्याने नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी घाबरण्याची गरज नसुन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच जुने फोटो व्हायरल करून जनतेत दहशत निर्माण करू नये अशी सुचना सुद्धा त्यांनी दिली आहे. तर जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा व पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सतर्क राहुन भूकंपाच्या वेळी घराबाहेर निघून सपाट मैदानावर येवुन आपली काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; घराला तडे


यवतमाळ :
जिल्ह्यातील मराठवाडाच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी ( ता. २१ ) रात्री ९.१० ते ९.१५ वाजताच्या सुमारास तीन ते पाच सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.
आर्णी तालुक्याच्या सावळी ( सदोबा) सह एक किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी आदी गावात भूकंपाचे धक्के जाणवले. टीव्ही पाहणाऱ्यांनी , बाहेर झोपलेल्या नागरिकांनी हे धक्के अनुभवले. टीव्हीवरील फ्लॉवर पॉट पडणे, घरातील भांडे पडणे, बंद पंखे हालणे, घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या. चिचबर्डी परिसर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. याच भागातील नांदेड जिल्ह्यातील अंजनखेड, राणीधानोरा, गोंडवडसा, साकूर व यवतमाळ जिल्ह्यातील कवठा बाजार, कोसदनी, अंबोडा येथेसुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावातील नागरिकांनी भीतीने रस्त्यावर धाव घेतली.
पैनगंगा नदीच्या दोन्ही भागातील गावात हे धक्के जाणवले आहे. उमरखेड तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, मन्याळी, वडद, मुडाणा, बेलखेड या गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. जिल्ह्याच्या मराठवाडा सीमेवरील बहुतांश तालुक्यातील गावांमध्ये हे धक्के जाणवले आहे. महागाव तालुक्यातील करंजखेड, कासारबेहळसह सहा गावांमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले.

होय, धक्के जाणवले - जिल्हाधिकारी


दरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले की, उमरखेड तालुक्यातील ढाणकी व परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नुकतीच मिळाली. या माहितीची प्रशासनाकडून खातरजमा केली जात आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातही कुठे अशाच पद्धतीने भूकंपाचे धक्के जाणवले का याची माहिती घेतली जात आहे. मात्र हे धक्के अगदीच सौम्य स्वरूपाचे असल्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News