21 जून रोजी नांदेडात राज्यस्तरीय योग शिबीर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 15, 2019

21 जून रोजी नांदेडात राज्यस्तरीय योग शिबीर



नांदेड-15, ( मिलिंद व्यवहारे ) :
 येत्‍या 21 जून रोजी आतंरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त नांदेड येथे राज्‍यस्‍तरीय योग शिबिर घेण्‍यात येणार आहे. यानिमित्‍त आज शनिवार  ता.15 जून रोजी जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्‍न झाली.   

        जिल्‍हाधिकारी यांच्‍या दालनात झालेल्‍या बैठकिस अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, हरिव्‍दार येथील पतंजली योगपिठाचे मुख्‍य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्या, निवासी उप जिल्‍हाधिकारी अनुराधा ढालकरी, उप जिल्‍हाधिकारी प्रशांत शेळके, उप विभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसिलदार उज्‍वला पांगरकर, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर, प्रशांत दिग्रसकर, पतंजलीचे राज्‍य प्रभारी बाबू पाडळकर, विष्‍णू भुतडा, श्रीराम लाखे आदींची उपस्थिती होती.

      महाराष्‍ट्र शासनातर्फे आयोजित पतंजली योग पिठाच्‍या संयुक्‍त विद्यमाने आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त नांदेड येथे 21 जून 2019 रोजी राज्‍यस्‍तरीय योग शिबीर मामा चौक, असर्जन नांदेड येथे घेण्‍यात येणार आहे. यानिमित्‍त नियोजन बैठकित जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आढावा घेतला. या योग शिबीरात योग साधक, सामान्‍य नागरिक, शाळा- महाविद्यालयाचे विद्यार्थी यांना निमंत्रीत करण्‍यात येणार आहे. योग साधनेसाठी जिल्‍हयात आजपासून सकाळी 6 ते 8 दरम्‍यान भक्‍ती लॉन्‍स, मालेगाव रोड, नांदेड येथे प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्‍यात आले आहे. येत्‍या 19 जून 2019 पर्यंत हे प्रशिक्षण जिल्‍हयातील अधिकारी व कर्मचारी यांना देण्‍यात येणार आहे.

     राज्‍यस्‍तरीय योग शिबीराच्‍या अनुषंगाने दररोज जिल्‍हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 वाजता व सायंकाळी 5 वाजता नियोजन बैठक घेण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी दिली आहे. या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे, डॉ. नदंलाल लाकडे, विधी अधिकारी आनंद माळाकोळीकर, संदीप अल्‍लापूरकर, नितेशकुमार बोलोलू, संतोष निलेवार, विस्‍तार अधिकारी बंडू आमदूरकर आदींची उपस्थिती होती.



योग शिबीर स्‍थळाची पाहणी

      मामा चौक येथे होणा-या राज्‍यस्‍तरीय योग शिबीराच्‍या स्‍थळाची आज रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी 10 वाजता जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, महापालिकचे आयुक्‍त लहूराज माळी  पतंजली योग पिठाचे डॉ. जयदीप आर्या, जिल्‍हा पोलिस अधिक्षक संजय जाधव, आदी अधिकारी भेट देवून पाहणी करणार आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News