किनवट :
२१ जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने ' आंतरराष्ट्रीय योग दिवस ' म्हणून घोषीत केला आहे. त्यानुषंगाने शक्रवारी ( दि. २१ ) सकाळी सहा ते सात या वेळेत येथील श्री गजानन महाराज संस्थान सभागृहात तालुका प्रशासनाच्या वतीने ' तालुकास्तरीय योग शिबीर ' आयोजित करण्यात आले आहे.
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्याच्या या मुख्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. 'योगी बनो- निरोगी बनो- सहयोगी बनो- उपयोगी बनो ' हा संदेश जनमनात रुजविण्यासाठी आयोजिलेल्या योग शिबीरात सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी / कर्मचारी , प्राचार्य, मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, डॉक्टर, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते , व्यापारी,सर्व नागरिक, महिला, पुरुष, विविध क्रीडा संघटना, खेळाडू , एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट व गाईड, विद्यार्थी -विद्यार्थिनी आदींसह योगाची आवड असणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने तहसिलदार नरेंद्र देशमुख व तालुका क्रीडा अधिकारी विलास चव्हाण यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment