भारतीय बौद्ध महासभेने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, July 25, 2019

भारतीय बौद्ध महासभेने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 
यवतमाळ : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या वतीने  बौद्ध समाजातील 10 वी आणि 12 वी परिक्षेत 75% व 75% पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  बोधिसत्व बुद्ध विहार पिंपळगाव रोड  येथे हा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला .

                 जिल्हाध्यक्ष रवि भगत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव व नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिलकुमार आढागळे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करतांना आयु.भगत म्हणाले की,  विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे म्हणून हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
                 प्रारंभी तथागत सम्यक सम्बुध्द व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमांना पूष्पार्पण करण्यात आले. त्यानंतर  सामुदायिक त्रिसरण पंचशील घेण्यात आले . सत्कारार्थीच्या वतीने 10 वीतील गुणवंत  विद्यार्थिनी सलोनी मेश्राम व पालक चंद्रबोधी घायवटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 10 वीतील  51 आणि 12 वीतील  24 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. निलेश उके व योगानंद टेंभुर्णे यांनी आपल्या यशाचे गमक  विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले. अॅड. गोविंद बनसोड यांनी प्रास्ताविक व रुपेश वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र टेंभुर्णे यांनी आभार मानले. सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News