गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के व एन. जी. ओ.मनोज पांचाळ यांची बैलगाडीतून मिरवणुकीने सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, November 30, 2019

गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के व एन. जी. ओ.मनोज पांचाळ यांची बैलगाडीतून मिरवणुकीने सत्कार





         
लोहा ( नांदेड ) :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,धनंज (बुद्रुक) संकुल सुगाव येथे रमणीय अशा वृक्षराजीच्या छायेत चिमुकल्यांच्या लेझीम नृत्य अविष्काराने आसमंत दुमदुमून निघाला होता. विद्यार्थ्यांच्या हातातील विविधरंगी पताक्याने धर्मनिरपेक्षतेचा साज सोहळ्याला चढवला होता. बँडबाजाच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता. त्यात गावकर्‍यांनी केलेली अलोट गर्दी. अशी डोळ्याची पारणं फेडणार्या नेत्रदीपक वातावरणात चक्क बैलगाडीतून मान्यवरांची मिरवणुक काढण्यात आली.
       समाजाविषयी कमालीची कणव आणि सहानुभूती असलेले,  अनाथाचे नाथ, शेकडो वृद्ध आजी आजोबांचे दाते, मनोज पांचाळ यांनी शाळेला प्रशस्त स्वच्छतागृह, परसबाग आणि खेळणी दुरूस्तीसाठी पन्नास हजार रूपयाचे दान दिले.
       एवढंच नव्हे तर धनंज (बुद्रूक) नगरीतील माता भगिनीच्या डोक्यावरची घागर उतरविण्याचं अर्थात पाण्याचे नळ घरोघरी  पाईपलाईन करून देणार आहेत. शिवाय विद्यार्थ्यांसाठी हजारो पुस्तकांचे वाचनालय, खेळणीयुक्त शाळा, सोलार लाईट, विज्ञानपेट्या, कंपासपेट्या, ढोल-ड्रम, उत्कृष्ट साऊंड सिस्टिम, संगणक,आणि गावकर्‍यांसाठी अवघ्या काही दिवसात भजन साहित्य व वरील सर्व साहित्य उपलब्ध करून देणार आहेत. गावातील कुठलाच आधार नसलेल्या तीन वृद्ध महिला आजींना प्रत्येक महिन्याला ७०० रूपयांचे राशन आणि ३००रू. खर्च देण्याचे जाहीर केले. मोटीव्हेशनल स्पीकर असलेले मनोज पांचाळ,गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी आपल्या व्याख्यानाने मंत्रमुग्ध केले.


   यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक जी.एस.मंगनाळे  . यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुसा शेख ,टी.डी.हंबर्डे, अजिज शेख , शंकर शृगांरे  यांनी परिश्रम घेतले. गणपत चव्हाण यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News