नांदेड :
डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णाच्या न्याय हक्क व आधिकारासाठी लढणारी एकमेव संघटना रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शपथविधी दिनी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यलयासमोर घंटानाद अंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ब्रदर आदी बनसोडे यांनी दिली.
संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा अॅड. वैशालीताई चांदणे, प्रदेशाध्यक्ष डॉ. उमेश चव्हाण, मराठवाडा अध्यक्ष चंद्रकांत सरवदे, जिल्हा निरीक्षक डॉ. ढोबळे यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री शपथविधी दिनी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यलयासमोर घंटानाद अंदोलन आयोजित करण्यात येणार आहे.
गोरगरीब रुग्णांची होणारी धावपळ थांबावी, पैशा अभावी रुग्णांचे होणारे हाल, उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने रुग्ण दगावणे, उपचारासाठी व्याजाने पैसे काढणे, शेती विकणे, अश्या अनेक संकटांना दूर करण्यासाठी मोफत उपचार व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया झाल्याच पाहिजे ह्या महत्वपूर्ण बाबींकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हजारोंच्या जनसमुदायाने एकत्रित येवुन सामिल व्हावे असे आवाहन रुग्ण हक्क परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मुखेड, कंधार, देगलुर, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, भोकर,धर्माबाद,मुदखेड, किनवट व माहुर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. अशी माहिती कार्तिक सरोदे यांनी दिली.




No comments:
Post a Comment