गोकुंदा : राजर्षी शाहूनगर येथील ज्येष्ठ नागरिक तथा वाघी येथील मूळ रहिवाशी सुमित्राबाई निवृत्ती नगारे ( वय ७३ वर्षे ) यांचे शुक्रवारी ( ता. ८ ) रोजी सकाळी ११.३० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मुले व एक मुलगी , सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथील शिक्षिका नंदा निवृत्ती नगारे, रमेश निवृत्ती नगारे ( हैद्राबाद ) व सुरेश निवृत्ती नगारे ( नांदेड ) यांच्या त्या मातुःश्री होत.
शनिवारी (ता. ९ ) रोजी सकाळी ११.३० वाजता बसस्थानक, किनवट जवळील बौध्द स्मशानभूमीत त्यांचे पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.




No comments:
Post a Comment