किनवट :
अनिमिया मुक्त भारत निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा व शिवाजीनगर, किनवट आणि गोकुंदा आदि सह तालुक्यातील विविध शाळांत आयर्न गोळ्याव फोलिक अॅसिड वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, किनवट
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, किनवट येथे किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांचे हस्ते आयर्न गोळ्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी प्रभारी गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, केंद्रप्रमुख रमेश राठोड, राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त निवृत्त केंद्रप्रमुख रमेश चौधरी व निवृत्त मुख्याध्यापक राम पवार, सामाजिक कार्यकर्ते शिवन्ना क्यातमवार, प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, जी.जी. नैताम,पत्रकार मलिक चव्हाण, किरण ठाकरे व पोलिस काँस्टेबल पी.जी. बोदमवाड आदींची उपस्थिती होती. मुख्याध्यापक जीवन गुरनुले,सहशिक्षक उमाकांत मॅकलवार, आयुब गंभीर शेख, अफजल चव्हाण, सुनिल इंगोले आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
जि.प. प्रा. शाळा शिवाजीनगर , किनवट
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर , किनवट येथे सोमवारी (दि. २५ ) दुपारी दीड वाजता अनिमिया मुक्त भारत निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत आयर्न गोळ्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
प्र.गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात तालुका विधी सेवा समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, वकील संघाचे सचिव अॅड. मिलिंद सर्पे, पत्रकार किशन भोयर, नगरसेवक जहिरोद्दीन खान, उत्तम कानिंदे यांचे हस्ते आयर्न गोळ्या वाटप करण्यात आल्या.
मुख्याध्यापक राम बुसमवार, सहशिक्षक देवकते व मिनाक्षी चाडावार आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मारूती मुलकेवार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
गोकुंद्याच्या जिल्हा परिषद प्रशालेत सशक्त विद्यार्थी अभियानात आयर्न गोळ्या मुलांना खाऊ घातल्या
गोकुंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद ( मुलींचे ) हायस्कूल येथे सोमवारी (दि. २५ ) दुपारी दोन वाजता अनिमिया मुक्त भारत निर्माण करण्यासाठीच्या सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत आयर्न गोळ्या मान्यवरांच्या हस्ते मुलांना खाऊ घातल्या... अन् गोळ्या -औषध वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रभारी गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या संगीता प्रवीण मॅकलवार, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शबाना परवीन शेख जमीर, तालुका विधी सेवा समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, वकील संघाचे सचिव अॅड. मिलिंद सर्पे, पत्रकार किशन भोयर, उत्तम कानिंदे, समुदाय अधिकारी डॉ. डी.एम.नरवाडे, आरोग्य सेवक एम.आय.दिंडे आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
वरील सर्व मान्यवरांचे हस्ते आयर्न गोळ्यांचा एक डोस प्रत्यक्ष मुलांना खाऊ घातला.
मुख्याध्यापक अनिल नेवळे, सहशिक्षक पी.बी. जाधव, योगेश वैद्य, श्रीमती रमन्ना रच्यावार, वर्षा गोरे, श्रीमती कवटीकवार,आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. रवि नेम्माणीवार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
जि.प. प्रा.शा.दरसांगवी (सि. )
दरसांगवी (सि.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व दोन्ही अंगणवाडीतील मुलांना आयर्न गोळ्या व फोलिक अॅसिड औषध वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक गोपाल कनाके, सहशिक्षक जाधव अंगणवाडी कार्यकर्त्या शोभा राठोड, मीरा चव्हाण, आशा वर्कर अनिता कनाके आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी आरोग्य सेवक चव्हाण, उपसरपंच संजय पवार, ग्रामसेवक मोरे, ग्राम पंचायत सदस्य दिलीप जाधव यांचे सह महिला, पालक बहुसंख्येनं उपस्थित होते.
No comments:
Post a Comment