औरंगाबाद :
'राष्ट्रनिर्माते बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती ' यांच्या वतीने दिनांक २२,२३,२४ नोव्हेंबर २०१९ रोजी मिलिंद महाविद्यालय स्टेडिअम ,नागसेनवन,औरंगाबाद येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय धम्मपरिषदेत औरंगाबाद येथील धम्मसेवकांची अनोखी धम्मसेवा ही ह्या धम्मपरिषदेचा मानबिंदू ठरली आहे. औरंगाबाद येथील धम्मसेवक,सेविकांनी औरंगाबाद नगरीत बाहेरून येणाऱ्या धम्मसेवक, उपासक, उपासिका यांच्या राहण्याची व्यवस्था कुठल्याही हॉटेल्स अथवा अन्य ठिकाणी न करता औरंगाबाद येथील धम्मसेवक स्वतःच्या घरी करणार आहे.
या धम्मसेवेकरीता औरंगाबादचे एक-दोन कुटुंब नाही तर आता पर्यंत तब्बल 200 कुटुंब तयार आहेत. हा अनोखा उपक्रम राबवून औरंगाबाद येथील कुटुंबांनी आणि धम्मसेवकांनी एक ऐतिहासिक पायंडा घालून दिला आहे. ही एक प्रबुद्ध अशी संकल्पना आहे. मुंबई हुन येणाऱ्या ३०० ते ३५० धम्मसेवक उपासक उपसिकांच्या रहाण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी औरंगाबाद येथील कुटुंबांनी स्वतः हुन पुढे येऊन स्वीकारली आहे. हा मनाचा मोठेपणा औरंगाबाद येथील धम्मसेवक उपासक उपसिकांमध्ये पहायला मिळत आहे.

आदरणीय पूज्य दलाई लामा स्वतः तसेच १० देशांचे पूज्य भिक्खु संघ ह्या परिषदेला येत असल्यामुळे लाखो उपासक , उपासिका येथे येणार आहेत. ह्या परिषदेत औरंगाबादच्या धम्मसेवकांची ही अनोखी आणि आगळीवेगळी संकल्पना राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे चीफ कॉर्डीनेटर डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या कल्पनेतून साकार होत आहे. केवळ IAS डॉ.हर्षदीप कांबळे ह्या नावामुळे आणि त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे औरंगाबाद येथील कुटुंबाने ह्या अनोख्या धम्मसेवेला होकार दिला आहे.
औरंगाबादची धम्मसेवा ही आपल्या समितीच्या वतीने सुरु केलीली एक नवीन सुरुवात आहे. "सो ये तो हमारी शुरुवात हे।" हा अनोखा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम औरंगाबाद येथे होत असलेल्या आंतराष्ट्रीय धम्मपरिषदेच्या माध्यमांतून होत आहे. त्यासाठी औरंगाबादच्या धम्मपरिवारांचे कौतुक करावे तेवढे कमीच. प्रबुद्ध परिवाराच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे.

औरंगाबादेत 22 नोव्हेंबरपासून तीन दिवस जागतिक बौद्ध धम्म परिषद,
औरंगाबाद : जागतिक किर्तीचे बौध्द धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत 22 ते 24 नोव्हेंबर असे तीन दिवस जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेची सध्या जोरात तयारी सुरू आहे. या धम्म परिषदेला 13 देशांमधील बौध्द भिक्खू उपस्थित राहणार आहेत. राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या पत्नी रोजना व्हॅनीच कांबळे यांच्या पुढाकारातून ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. नागसेन वनातील पीईएसच्या स्टेडियमवर होत असलेल्या या धम्म परिषदेत जगभरातील बौद्ध भिक्खू पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या धम्म परिषदेत अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक पूज्य भदन्त सदानंद महास्थवीर, श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा, भदन्त बोधिपालो महाथेरो (लोकुत्तरा), भदन्त चंदिमा (सारनाथ), भदन्त मैत्री महाथेरो (नेपाळ), भदन्त संघदेसना (लडाख), भदन्त शिवली (श्रीलंका), भदन्त वॉनसन साऊथ (कोरिया), भदन्त प्रधामबोधिवाँग, भदन्त प्रहमा केयरती श्रीउथाना (थायलंड), भदन्त पीच सेम (कम्बोडिया) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, 22 नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता होईल. यावेळी १३ देशांतील प्रमुख भिक्खू, विचारवंतांची प्रमुख उपस्थिती असेल. शनिवारी व रविवारी पहाटे ६ ते ८ या वेळात पीईएसच्या मैदानावर विपश्यना होईल. ज्येष्ठ भदन्त हे उपासक- उपासिकांना विपश्यनेचा सप्रयोग अर्थ उलगडून दाखवतील.
‘‘ प्रबुद्ध व्यक्ती, कुटुंब आणि पर्यायाने प्रबुद्ध भारताची निर्मिती करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जागतिक धम्म परिषद एक माध्यम ठरावे, हेच या परिषदेचे अंतिम ध्येय आहे. संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सिद्ध झाले पाहिजे.’’
-डॉ. हर्षदीप कांबळे, संयोजक
शनिवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत चौका येथील लोकुत्तरा महाविहारात फक्त बौद्ध भिक्खूंसाठी संवाद सत्र होणार आहे. दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘बौद्ध संस्कृती आणि जीवन जगण्याचा मार्ग’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत ‘बुद्धाने दिलेली शिकवण’ याचे विवेचन व विश्लेषण जगभरातून आलेले ज्येष्ठ भिक्खू करणार आहेत. हे दोन्ही परिसंवाद व चर्चा पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असून, ते सर्वांसाठी खुले आहेत. दुपारी १ वाजेपासून ३ वाजेपर्यंत युवकांसाठी एक सत्र होणार आहे. दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत उपासक -उपासिका व त्यांच्या कुटुंबासाठी एक स्वतंत्र सत्राचे आयोजन केले आहे. ५.३० वाजता परिषदेचा सांगता समारंभ होईल. रात्री ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. त्यानंतर परिषदेची सांगता होईल.
24 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता दलाई लामांची धम्मदेसना : या जागतिक धम्म परिषदेत 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत जागतिक किर्तीचे बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांचे बुद्धांनी दिलेल्या प्रेम, शांती, प्रज्ञा, शील, करूणा, अहिंसा, सामाजिक बंधुभाव या सर्वोच्च जीवनमूल्यांवर आधारित धम्मदेसना होणार आहे.

No comments:
Post a Comment