खंडूजी गणपतराव कानिंदे यांचे निधन ; 23 नोव्हें. दुपारी 4 वा. एकंबा ( हिमायतनगर ) येथे अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, November 23, 2019

खंडूजी गणपतराव कानिंदे यांचे निधन ; 23 नोव्हें. दुपारी 4 वा. एकंबा ( हिमायतनगर ) येथे अंत्यसंस्कार



हिमायतनगर : येथून जवळच असलेल्या एकंबा येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरीक खंडुजी गणपतराव कानिंदे (वय 99 वर्षे) यांचे दिनांक 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे दोन वाजता वृध्दापकाळाने  निधन झाले. 
त्यांच्या पार्थिवावर एकंबा (ता. हिमायतनगर ) येथील त्यांच्या शेतात शनिवारी दिनांक 23 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवारआहे.
भिमराव खंडूजी कानिंदे ( माजी सरपंच ) , भोजराज खंडूजी कानिंदे,
अभियंता भरतकुमार खंडूजी कानिंदे (बानाईचे राज्य पदाधिकारी ),
गौतम खंडूजी कानिंदे,
मंजुश्री स्मृतिशेष घनश्याम पाटील ( पुणे ) व
आशा अभियंता अशोक येरेकार ( औरंगाबाद )  यांचे ते वडील होत.

भावपूर्ण आदरांजली          

माझे मोठे मामा खंडूजी गणपत कानिंदे अतिशय रूबाबदार व्यक्तीमत्व , पीळदार मिशा हे त्यांचे वैशिष्ट्य.तेवढेच कर्म‌ठ, शरीरयष्टी मध्यम, तेजतर्रार चेहरा, नेहमी पांढरा नेहरू शर्ट,धोतर आणि डोक्यावर फेटा या पेहरावात शोभून दिसणार अस व्यक्तीमत्व होते. पत्नी,चार मुलं, दोन मुली सुना,जावंई,नातवंडं,पणतू असा खूप मोठा परिवार त्यांच्या पश्चात आहे.जरी परिवार मोठा असला तरी त्यांचा आपल्या परिवारावर चांगलाच अंकुश होता.त्याचाच परिणाम म्हणून आज त्यांची मुले चांगली शिकली.मोठा मुलगा आयु.भिमराव कानिंदे यांनी एंकबा येथील प्रथम नागरिक (सरपंच) होण्याचा मान पटकावला.भरतकुमार कानिंदे यांनी उच्च शिक्षण घेऊन ते आज सार्वजनिक बांधकाम विभागात वास्तूविद्याविशारद म्हणून काम पाहतात,समाज कार्यात अग्रेसर आहेत.ही सर्व देन माझे मामा स्मृतीशेष खंडूजी गणपत कानिंदे यांची आहे.स्वत: अशिक्षित होते पण आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले.आणि आज हे कानिंदे परिवार स्मृतिशेष खंडूजी गणपत कानिंदे यांच्या कलागुणांनी बहरल.असं हे भारदार व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं.माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.

-विनायक भगत, मुंबई.
-प्रा.डॉ. बुध्दरत्न गोविंदराव भवरे, अलिबाग


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News