स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्‍या वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावेत - जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, November 30, 2019

स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्‍या वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावेत - जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे






नांदेड :
 ग्रामीण भागातील आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण असणारी शौचालयाची योजना गावात राबविणे आवश्‍यक आहे. स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्‍या वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावेत असे आवाहन जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
             हिमायतनगर तालुक्‍यातील जवळगाव येथे दिनांक 25 नोव्‍हेंबर रोजी जि.प. अध्‍यक्षा शांताबाई जवळगावकर व सिईओ अशोक काकडे यांनी शौचालय बांधकामाची पाहणी केली. गावस्‍तरावर प्रत्‍येक कुटूंबांकडे शौचालय असणे महत्‍वाचे असून बांधण्‍यात आलेल्‍या शौचालयाचा वापर लाभार्थी करत आहेत किंवा नाही यासाठी सरपंच, ग्रामसेवक, गावस्‍तरावरील विविध समित्‍या, महिला बचतगट यांनी पुढाकार घेवून शौचालय वापरासाठी जनजागृती करावी.
 वैयक्तिक शौचालयासह शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, खाजगी संस्‍था, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र तसेच शासकीय व नि‍मशासकीय कार्यालयात शौचालयाची सुविधा असणे बंधनकारक आहे. गावस्‍तरावर सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापनाचे नियोजन करुन गावात कायम स्‍वच्‍छता ठेवण्‍यावर भर देणे आवश्‍यक असल्‍याचे मत जि.प. अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांनी व्‍यक्‍त केले.

पायाभूत सर्वेक्षणानुसार नांदेड जिल्‍हा हागणदारीमुक्‍त झाला आहे. जे लाभार्थी पायाभूत सर्वेक्षणातून सुटले होते, अशा लाभार्थ्‍यांची नावे यादीत घेण्‍यात आली. या लाभार्थ्‍यांचे वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम 15 डिसेंबर अखेर पूर्ण करण्‍यासाठी जिल्‍हयातील सर्व गट विकास अधिकारी यांना मुख्‍य कार्यकारी अधिकारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी अर्धशासकीय पत्र दिले आहे. 31 डिसेंबर 2019 नंतर वैयक्तिक शौचालय बांधकाम घटकासाठी बंद करण्‍यात येणार असल्‍याचे पत्र राज्‍य शासनाने पाठविले आहे. त्‍यामुळे 15 डिसेंबर अखेर उर्वरी शौचालयाचे बांधकाम करुन पात्र लाभार्थ्‍यांना बारा हजार रुपयाचा लाभ द्यावा. सदरचा निधी 31 डिसेंबर 2019 पूर्वी खर्च न झाल्‍यास गट विकास अधिकारी यांच्‍यावर जबाबदारी निश्चित करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे विहित मुदतीत कामे पूर्ण करुन निधी खर्च होईल याबाबत दक्षता घेण्‍याच्‍या सूचना गट वि‍कास अधिकारी यांना देण्‍यात आल्‍या आहेत. यासाठी दर सोमवारी जिल्‍हास्‍तरावर गट विकास अधिका-यांचा आढावा घेण्‍यात येणार असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले आहे. 

पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेले एकूण 36 हजार 543 शौचालय बांधकामाचे उद्दीष्‍ट असून आतापर्यंत 20 हजार 162 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. जिल्‍हयात अजून 16 हजार 461 शौचालयाचे बांधकाम शिल्‍लक आहे. यात अर्धापूर तालुक्‍यात 760 शौचालय, भोकर- 1 हजार 601, बिलोली- 1 हजार 479, देगलूर- 1 हजार 40,  धर्माबाद- 486, हदगाव- 1 हजार 265, हिमायतनगर- 72, कंधार- 196, किनवट- 1 हजार 97, किनवट- 1 हजार 97, लोहा- 884, माहूर- 2 हजार 15, मुदखेड- 291, मुखेड- 2 हजार 98, नायगाव- 1 हजार 183, नांदेड- 425 तर उमरी तालुक्‍यात 1 हजार 604 शौचालयाचे बांधकाम शिल्‍लक आहे. तरी येत्‍या डिसेंबर अखेर शौचालयाचे बांधकाम करावे असे आवाहन करण्‍यात आले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News