किनवट :
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्मान निगम , जिल्हा प्रशासन नांदेड,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा परिषद व समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजने अंतर्गत सेवाज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत विविध साधने व संसाधने वाटपासाठी मातोश्री कमलताई ठमके इंग्लीश स्कूल, कोठारी ( चि), ता. किनवट येथे ता. 15 व 16 डिसेंबर रोजी शिबीर आयोजित केली असून
ता. 04 ते 14 डिसेंबर 2019 सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाव नोंदणी करुन घेण्याचे प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे .
यासाठी पंचायत समिती, किनवट येथे दिव्यांग नोंदणी कक्ष स्थापन केला आहे . या कक्षात दिव्यांगांची नोंदणी कामासाठी पी.जी. कांबळे, एम.बी.वायकुळे, के.डी. तोडकर व एस.व्ही. बनकर यांची नियुक्ती करण्यात आली असुन आज पर्यंत एकुण 600 दिव्यांगांची नोंदणी झाली आहे . मातोश्री कमलताई ठमके इंग्लीश स्कूल, कोठारी ( चि), ता. किनवट येथे ता. 15 व 16 डिसेंबर 2019 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत 'दिव्यांगासाठी व सेवाज्येष्ठ नागरिकांसाठी विविध संसाधने व साधने मोफत वाटपासाठी तपासणी शिबीर' आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिराला किनवट तालुक्यातील दिव्यांगांनी व ज्येष्ठांनी उपस्थित राहावे असे अवाहन प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार नरेंद्र देशमुख , पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुभाष धनवे व गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी केले आहे .





No comments:
Post a Comment