महापरिनिर्वाण दिनी 41 आंबेडकरी अनुयायांनी रक्तदान करून कृतिशील अभिवादन केले - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 5, 2019

महापरिनिर्वाण दिनी 41 आंबेडकरी अनुयायांनी रक्तदान करून कृतिशील अभिवादन केले



कारंजा :
गुरुवारी ( ता.5 )  सकाळी 11  ते दुपारी 4 या कालावधीत विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिद्धार्थ बुद्ध विहार, गौतम नगर कारंजा (लाड ) येथे आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात 41 आंबेडकरी अनुयायांनी रक्तदान करून कृतीशील अभिवादन केले.
          येथील नवयुवक सम्यक मित्र मंडळाने शासकिय रक्तपेढी वाशिम व उपजिल्हा रुग्णालय  यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित केले होते. यावेळी 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले यामधे 35 युवक तर मनिषा गणविर, अर्चना लांडगे, पल्लवी वानखडे, ज्योती भगत, शानोत्तरा शेंडे, विना भगत, या 6 महीलांनी सुध्दा रक्तदान केले. पुरूषासोबत महीलांनी सुद्धा उत्साहाने रक्तदान करून खऱ्या अर्थाने डाँ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्ताने त्यांना खरी कृतिशील आदरांजली वाहिली.
       यावेळी शासकीय रक्तपेढी वाशिम व ग्रामीण रूग्णालय कारंजा (लाड) येथील कर्मचारी तसेच समाजसेवक हंसराज शेंडे, समाजसेवक प्रज्वल गुलालकरी, गुरूदेव सेवाश्रमचे सुनिल दसमुखे, डाँ.नवनाथ भेंडे, रक्त संक्रमण अधिकारी डाँ.कुंडलीक फुफाटे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी चंदन वासनिक, सुभाष फुके, सचिन दंदे, तुषार नांगरे, लक्ष्मण काळे, टि.एस.कड, अश्विनी घोडेस्वार यांनी सहकार्य केले.

       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवयुवक सम्यक मित्र मंडळाचे कार्यकर्ते सचिन खांडेकर, संतोष कांबळे, अँड.पंकज सावळे, सुर्यकांत लांडगे, स्वप्निल चक्रनारायण, निखिल सोनोने, कुंदन तायडे, सुरज गजभिये, रामा बनसोड, निलेश लोणारे, तुषार श्रीरामे यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News