किनवट :
अहो ऐकलं का ? हेअर पार्लर मालकाने अतिदुर्गम भागातील छत्रपती शिवाजी हायस्कूल बेल्लोरी (धानोरा ) या शाळेत जाऊन गोर-गरीब 81 आदिवासी मुलांच्या मोफत कटींग करून आपला वाढदिवस साजरा केला.
किनवट येथील केशकर्तनाचे आधुनिक दालन असलेल्या 'एजे (AJ ) हेअर पार्लर स्पा ' चे चालक अजय हळदकर यांचा शुक्रवारी ( ता. 27) वाढदिवस होता. त्यांनी आपला वाढदिवस आगळावेगळा करण्याची कल्पना आपले मित्र युवा कार्यकर्ते शिवा सोळंके पाटील यांना बोलून दाखविली. त्यांनी लगेच बेल्लोरी ( धानोरा ) येथे आपली शाळ आहे. तिथे आपण जाऊन तुमची कल्पना प्रत्यक्ष साकारू असे सांगितले. तेव्हा श्री हळदकर यांनी शुक्रवारी ( ता. 27 ) आपले दुकान बंद करून दुकानातील सर्व कारागिर
, अक्षय हाळदकर, श्रीनिवास पोलसवार, संतोष सवने, हर्षद मुनेश्वर ,शंकर बोडके यांना सोबत घेऊन अतिदुर्गम डोंगरी भागात असलेल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल बेल्लोरी (धानोरा ) गाठले. येथील गोर-गरीब 81 आदिवासी मुलांची मोफत कटिंग करून एक आगळा वेगळा वाढ दिवस साजरा केला.
या नवख्या उपक्रमाबद्दल संस्थापक तथा मुख्याध्यापक सुरेश पाटील सोळंके व सचिव नंदाताई सोळंके यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन अजय हळदकर यांचा सत्कार केला व वाढदिवसाचा केक कापून त्यांचे अभिनंदन केले.शाळेतील शिक्षक राजेश नेम्माणीवार यांचाही वाढदिवस असल्याने त्यांनाही शुभेच्छा दिल्या. या अगळा वेगळा वाढदिवसाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. महागड्या, हायफाय सलूनमध्ये जाऊन कटींग करण्याची गोर- गरीब पालकांचीच ऐपत नसते ;तर विद्यार्थी यापासून कोसो दृर असतात. परंतु वाढदिवसानिमित्त श्रीहळदकर यांनी 32 किलोमीटर अंतरावरील थेट शाळा गाठून राबविलेल्या सामाजिक उपक्रमाची सर्वत्र कौतुकास्पद चर्चा होत आहे.
No comments:
Post a Comment