किनवट :
साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या २४ व्या वर्धापन दिनी बुधवारी ( दि . २५ ) डायलेसिस युनिटचे उद्घाटन नांदेडचे सुप्रसिद्ध डॉ . विजय मैदपवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.
साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमीत्त सुरु असलेल्या तीन दिवसीय सोहळ्या दरम्यान ( दि . २५ रोजी ) साने गुरुजी रुग्णालय किनवट येथे डायलेसिस युनिट चे उद्घाटन करण्यात आले . नाम फाऊंडेशन तर्फे डायलेसिस मशिन आणि नपाते फाऊंडेशन तर्फे मिळालेल्या आर्थिक मदतीने हे युनिट उभे करण्यात आले असून नांदेडच्या डॉ . मसारे व डॉ . विजय मैदपवाड यांनी तांत्रीक सहकार्य केले तसेच अनेक मदतीचे हात या युनिटच्या उभारणीसाठी पुढे आले असे साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ . अशोक बेलखोडे यांनी प्रास्ताविकात सांगीतले . यावेळी डॉ . मैदपवाड यांनी उपस्थितांना डायलेसिस या विषयावर मार्गदर्शन केले , व्यासपीठावर अध्यक्षस्थानी किनवटचे माजी नगराध्यक्ष इसाखान सरदारखान हे होते तर डॉक्टर्स असोसिएशन चे प्रतिनिधी डॉ . संजय लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्रा . किशनराव किनवटकर , प्रा . रामप्रसाद तौर , डॉ . राहूल तौर , योगशिक्षक अखिल खान , गंगन्नाजी नेम्माणीवार , मुरलीधर बेलखोडे , डॉ . शोभा बेलखोडे , रिद्धिश्वर बेलखोडे व बेलखोडे परिवाराचे इतर सदस्य , डॉ . तेलंग , डॉ . उस्मान , डॉ . विजय काळे , डॉ . संदीप जन्नावार , डॉ . सुरेंद्र जन्नावार , डॉ . सुर्वे , डॉ . पुनम तौर , डायलेसिस युनिटचे तंत्रज्ञ मेरसिंग चव्हाण , किनवट शहरातील प्रतिष्ठीत नागरिक आणि डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते .




No comments:
Post a Comment