किनवट :
शिक्षणाचे तंत्र वा साधन कोणतेही असो, दिव्यांगाचे शिक्षण हा एक स्वतंत्र शिक्षणसंप्रदाय आहे. जेथे शक्य असेल तेथे वैद्यकीय उपचार, शिक्षण व पुनर्वसन ह्यांच्या द्वारा अपंग अवयवांची अथवा इंद्रियांची शक्ती पुन्हा वाढीला लावली पाहिजे. ते शक्य नसेल, तर त्या शक्तीची जागा भरून काढण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे. हे शिक्षण मुलांच्या गरजेनुसार आणि अशा मानसशास्त्रीय पद्धतीने दिले गेले पाहिजे, की मुलाच्या मनातील सारे गंड आणि विकृती निघून जाव्यात. मुलाला समाजात पुन्हा अर्थार्जन करणारा स्वावलंबी घटक म्हणून परत जाता यावे, ह्यासाठी शैक्षणिक द्ृष्ट्या करण्यात आलेले प्रयत्न जरी संख्येने थोडे असले, तरी सामाजिक प्रतीक म्हणून त्यांना महत्त्व आहे. असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे यांनी केले.
मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूल, कोठारी ( चि) येथे सोमवारी ( दि. १६ ) ' दिव्यांग व ज्येष्ठ नागरिंकांसाठी साधने व संसाधने मोफत वाटपासाठी तपासणी शिबीराच्या ' समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी नरेंद्र देशमुख, गट विकास अधिकारी सुभाष धनवे मंचावर उपस्थित होते. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी आभार मानले.
पुढे श्री कोलगणे म्हणाले,अपंगतेमुळे येणारे वैफल्य, निराशा, आलस्य ह्यांच्या जखडबंदीतून अपंग मुलांची मुक्तता करण्याचे कार्य शिक्षकाला करावे लागते. अनुभव हा एक शिक्षक असतोच, तथापि मुलाची अनुभव घेण्याची तयारी आणि त्यासाठी शिक्षकाने उपलब्ध करून दिलेली संधी ह्यांचा मेळ बसावा लागतो. अशा शिबीरातून अलिम्कोचे दर्जेदार साहित्य लाभार्थींना मिळते. राष्ट्रीय सेवयोजना स्वयंसेवक भाग्यश्री राठोड, मुकूंद वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.
शिबीरासाठी महत्वूर्ण योगदेणारे अलिम्को मुंबईचे डॉ. सुदीपकुमार जेना यांच्या नेतृत्वाखाली कृत्रिम अवयवय तज्ज्ञ डॉ. आशुतोष पॉल, डॉ. रुपेश जाधव, डॉ. विजय मार्कंड, ऑडिओलॉजिस्ट डॉ. राजकुमार यादव, डॉ. सुशिल सिंग, नेत्रतज्ज्ञ डॉ.मितेश शाह, दंततज्ज्ञ डॉ. अनिल देवसरकर, डॉ.आश्विनी देवसरकर, डॉ.मनीष आष्टेकर, डाटा एंट्री ऑपरेटर सिभम शुक्ला, अमित द्विवेदी, गोपाल तिवारी यांचा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र ढोले, डॉ. गजानन काळे, डॉ.सी. एल. झडते, मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, प्राचार्य शुभांगीताई ठमके,
बळीराम पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा.डॉ. पंजाब शेरे, विस्तार अधिकारी विठ्ठल श्रिमनवार, गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे उत्तम कानिंदे, राम बुसमवार यांचा मान्यवरांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला.
शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतल्याबद्दल बाबूराव इब्बीतदार, पी.जी. कांबळे, एम.बी.वायकुळे, केशव डहाके, बी.एम. अस्वले, के.डी. तोडकर, ए.व्ही. बनकर, आर.एन.नरवाडे आदिंना यावेळी गौरविण्यात आले.





No comments:
Post a Comment