सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील यांनी आजची दुपार दिव्यांगा सोबत घालवली... अन् त्यांच्या विविध गरजांसाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचा आशावाद व्यक्त केला. - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, December 15, 2019

सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील यांनी आजची दुपार दिव्यांगा सोबत घालवली... अन् त्यांच्या विविध गरजांसाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचा आशावाद व्यक्त केला.




किनवट :
... अहो काका तुमचा संपूर्ण एक पाय कसा काय गेला ?... या शिबीरातून मोजमाप करुन... तुम्हाला नवीन कृत्रीम पाय मिळतोय..., मावशी तुला डोळयांनी स्पष्ट दिसत नाही काय...? या शांत व्हीलचेअरवर शांत... निशब्द बसलेल्या बाळाला काय झालंय... त्याला शिबीरातून काय मिळतय... आजोबांसाठी दातांच्या कवळीचे मोजमाप घेता काय ? असे नानाविध प्रश्न विचारत ... दिव्यागांची आस्थेवाईकपणे चौकशी करत सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील यांनी आजची दुपार दिव्यांगा सोबत घालवली... अन् त्यांच्या विविध गरजांसाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचा आशावाद व्यक्त केला.
          निमित्त होते मातोश्री कमलताई ठमके इंग्लीश स्कूल, कोठारी ( चि) येथील ' दिव्यांग व सेवाज्येष्ठ नागरिकांसाठी विविध साधने व संसाधने मोफत वाटपासाठी तपासणी शिबीराचे '. भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, राष्ट्रीय वयोश्री योजना,भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ( अलिम्को ) , नांदेड जिल्हा प्रशासन,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र  व जिल्हा परिषद व समाजकल्याण विभागाच्या वतीने या दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास भेट देण्यासाठी स्वतः खासदार हेमंतभाऊ पाटील येणार होते. परंतु संसद अधिवेशनानिमित्त ते दिल्लीत असल्याने त्यांच्या प्रतिनिधी म्हणून राजश्रीताई हेमंत पाटील यांनी शिबीराला हजेरी लावली होती.


          मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी राजश्रीताई  पाटील यांचे शाल व बुके देऊन स्वागत केले. यावेळी शिबीराचे नोडल अधिकारी प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार नरेंद्र देशमुख , तालुका समन्वयक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुभाष धनवे, सहायक शिबीरप्रमुख गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, उपसभापती गजानन कोल्हे पाटील उपस्थित होते.
          नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार,सेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील मुरकुटे, सुरज सातुरवार, मारोती दिवसे पाटील, सुजीत मॅकलवार, मनोज तिरमनवार, कपील रेड्डी, किरण तिरमनवार, खासदार यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड, शेख मुसा, महिला कार्यकर्त्या सागर शिंदे, श्रीमती कपाटे, श्रीमती जयस्वाल आदिंनीही या शिबीरास भेट दिली.
          

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News