किनवट :
बळीराम पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. पंजाब शेरे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. डॉ.आंबेडकर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष त्रिरत्न भवरे व पंचायत समितीचे माजी सभापती जोगेंद्र नरवाडे यांचे हस्ते सन्मान पत्र व स्मृती चिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जळगावकर, जि.प.सदस्या जोत्सना नरवाडे, ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड,दिलिप शिंदे,पत्रकार अनिल मादसवार,भिमराव कावळे, शेख खयुम, सेक्युलर मुव्हमेंटचे जिल्हा संघटक अॅड. मिलिंद सर्पे, बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे, इब्टाचे जिल्हा कार्याध्यक्ष उतम कानिंदे, क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर, भिमराव दुधारे, बी.एस.सरोदे, दता डोंगरे, अनिल डोईफोडे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. मनोज राऊत यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मण भवरे यांनी आभार मानले. या प्रसंगी आमदार माधवराव पा.जळगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रा.डॉ. पंजाब शेरे यांनी अत्यंत प्रतिकुल प्रिस्थितीवर मात करून आपलं एम.ए. ( मराठी ) पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तालुक्यातील आदिवासींची लोकगीतं या विषयावर पी.एच् डी. केली. अनेक ठिकाणी शोधनिबंध वाचन केले. संशोधन प्रकल्पाच्या उत्कृष्ट सादरीकरणास त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. निवडणूकीच्या स्वीप कक्षात कलावंत म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं आहे. तालुक्यात होणाऱ्या शासकीय वा सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कार्यकर्त्यांची टीम घेऊन ते तयार असतात.नुकताच त्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक चळवळीतील योगदानाबद्दल त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या यशाद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment