मुंबई येथे आझाद मैदानावर चार जानेवारीस CAA व NRC विरुद्ध "सेक्युलर मुव्हमेंट",च्या वतीने निदर्शने-धरणे आंदोलन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, December 29, 2019

मुंबई येथे आझाद मैदानावर चार जानेवारीस CAA व NRC विरुद्ध "सेक्युलर मुव्हमेंट",च्या वतीने निदर्शने-धरणे आंदोलन



किनवट :
"सेक्युलर मुव्हमेंट" या फुले - आंबेडकरी विचार धारेवर आधारलेल्या सामाजिक संघटनेच्या  व समविचारी संघटनांच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर  दि.४ जानेवारी  रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी रजिस्टर या विरोधात निदर्शने-धरणे  आंदोलन करण्यात येणार असल्याचे  सेक्युलर मुव्हमेंट चे राज्य  अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे, कार्याध्यक्ष भरत शेळके, उपाध्यक्ष डाॅ.अशोक गायकवाड, सरचिटणीस प्रा.डाॅ.भरत नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
     धरणे व निदर्शने आंदोलनास राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष तथा जागतिक भाषा तज्ज्ञ डाॅ.गणेश देवी, मराठी चित्रपट अभिनेते अशोक लोखंडे, अनमोल धर्माधिकारी (दिग्दर्शक) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ४ जानेवारी  रोजी होणाऱ्या या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील
कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेक्युलर मुव्हमेंटचे  जिल्हा संघटक अॅड. मिलिंद सर्पे, राज्य सहसचिव प्रा. डाॅ. अंबादास कांबळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News