''सावित्रीने दिली आम्हा हाती पाटी...!"
-प्रा.नंदू वानखडे
सावित्रीने दिली /आम्हा हाती पाटी
शिक्षणाच्या पाठी/लागा म्हणे..
शिक्षणाच्या पाठी/लागा म्हणे..
शिक्षणाने येते /जाग्यावर मती
साधते प्रगती /माणसाची...
शिक्षणाअभावी /माणूस आंधळा
कुणी कापे गळा /आंधळ्याचा...
कुणी कापे गळा /आंधळ्याचा...
विश्वासू नये ती /कधी दैववाणी
माणसाची हानी/होते त्याने...
माणसाची हानी/होते त्याने...
नसिबाचा भोग/आणि योगायोग
सुटण्याच्या जोग/कोडं नाही...
सुटण्याच्या जोग/कोडं नाही...
हाताच्या बळाने /करावेत कष्ट
ते विज्ञाननिष्ठ / राहूनिया....
ते विज्ञाननिष्ठ / राहूनिया....
सोडूनिया द्यावे/वाईट व्यसनं
कर्ज काढून सण / करू नये...
कर्ज काढून सण / करू नये...
भुंकल्यात जरी /अंगावर कुत्री
तरीही सावित्री /भ्याली नाही...
तरीही सावित्री /भ्याली नाही...
अबला नारीला/ केलं भयमुक्त
शिक्षणाचा हक्क /देऊनिया....
शिक्षणाचा हक्क /देऊनिया....
गोटे शेण माती /झेलल्यात किती
तरीही ना गती / थांबवली...!
तरीही ना गती / थांबवली...!
धन्य क्रांतिजोती/धन्य ती सावित्री
देशाची सुपुत्री/धन्य झाली...!
देशाची सुपुत्री/धन्य झाली...!
आता घरोघरी /सावित्रीच्या लेकी
पण त्यांची नेकी / बरी नाही....!
पण त्यांची नेकी / बरी नाही....!
आताच्या सावित्री / पार्लरात दंग
ऊडेच ना रंग/ चेह-याचा.....!
ऊडेच ना रंग/ चेह-याचा.....!
कोण आपल्यासाठी/राबला खपला
त्याचे काय मला /समजती.....!
त्याचे काय मला /समजती.....!
सहज ना बाई / ऊगवला हा दिसं
रातं दिसं पिसं / सावित्रीला....!
रातं दिसं पिसं / सावित्रीला....!
तिच्या ऊपकाराची / असु द्यावी जाणं
तिच्यामुळे मानं /मिळे तुला....!
तिच्यामुळे मानं /मिळे तुला....!
-प्रा.नंदू वानखडे ,
मुंगळा जि.वाशिम
मुंगळा जि.वाशिम
No comments:
Post a Comment