ऊज्वल प्रभा नभाची.....
-प्रा.नंदू वानखडे
'ही ऊज्वल प्रभा नभाची पाहील देश सारा..
ऋणात तोवरी भिमाच्या, राहील देश सारा...!
पाजळीत लेखणींना, मानवतेच्यासाठी
हा वारसा भिमाचा ,वाहील देश सारा...!
अभिव्यक्त स्वातंत्र्याची ,ऊमजेल जेव्हा भाषा
तुझ्यासमोर ऊभा, राहील देश सारा...!
बोलेन कौम माझ्या ,अबोल माणसांची...
बंधमुक्त माणसाला ,पाहील देश सारा...!
समतेचे महाकाव्य, रचले तू भीम बाबा
ही देत जगती ग्वाही ,राहील देश सारा...!
जाणतील लोक तुजला, संकटाच्या समयी...
एक तूच ऊभा समोरी, पाहील देश सारा...
सरतील युगे युगे ,पण तू सरणार नाही
तुज वंदना युगाची, वाहील देश सारा...!
No comments:
Post a Comment