"महापरिनिर्वाणदिन "
-अर्चना दिगांबर गरूड
भिमा, तुझी आठवण येता
मन माझे गहिवरुन जाते
भूवरी न प्रकटणार ऐसा नेता
जुळविले ज्याने आमचे विद्देशी नाते .
बनविले तुच आम्हां आत्मनिर्भर
करून मुक्त गुलामिचे बंध
ज्ञानाची कमान ताणून झालास विद्दाधनुर्धर
नि केलांस मोकळा आम्हां साठी ज्ञानाचा गंध .
जीवनी अखंड करूनी विद्देची भक्ती
बनलास भारतिय राज्यघटनेचा शिल्पकार
जगी सातासमुद्रापार पसरली रे तुझी किर्ती
केलेस मानवांसाठी खुले समतेचे द्वार .
आहे आज तुझा महापरिनिर्वानदिन
वाहू तुज साश्रुनयनांनी पुष्पांजली
आयुष्यभर कसे फेडू तुझे हे ऋण
अर्पूनी मौनाने तुज क्षणभर श्रध्दांजली .
मन माझे गहिवरुन जाते
भूवरी न प्रकटणार ऐसा नेता
जुळविले ज्याने आमचे विद्देशी नाते .
बनविले तुच आम्हां आत्मनिर्भर
करून मुक्त गुलामिचे बंध
ज्ञानाची कमान ताणून झालास विद्दाधनुर्धर
नि केलांस मोकळा आम्हां साठी ज्ञानाचा गंध .
जीवनी अखंड करूनी विद्देची भक्ती
बनलास भारतिय राज्यघटनेचा शिल्पकार
जगी सातासमुद्रापार पसरली रे तुझी किर्ती
केलेस मानवांसाठी खुले समतेचे द्वार .
आहे आज तुझा महापरिनिर्वानदिन
वाहू तुज साश्रुनयनांनी पुष्पांजली
आयुष्यभर कसे फेडू तुझे हे ऋण
अर्पूनी मौनाने तुज क्षणभर श्रध्दांजली .




No comments:
Post a Comment