महापरिनिर्वाणदिनी किनवट व गोकुंदा परिसरात महामानवास अभिवादन ; युवा पॅंथरच्या रक्तदान शिबीरात 80 अनुयायांनी रक्तदान करून वाहिली कृतिशील आदरांजली - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, December 6, 2019

महापरिनिर्वाणदिनी किनवट व गोकुंदा परिसरात महामानवास अभिवादन ; युवा पॅंथरच्या रक्तदान शिबीरात 80 अनुयायांनी रक्तदान करून वाहिली कृतिशील आदरांजली



किनवट : 
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त किनवट व गोकुंदा परिसरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. युवा पॅंथरने आयोजिलेल्या रक्तदान शिबीरात 80 अनुयायांनी रक्तदान करून कृतिशील आदरांजली वाहिली.
       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी (ता.6) सकाळी 10 वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादनाचा कार्यक्रम झाला.
            प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपाध्यक्ष अजय चाडावार, माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, रिपाइंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, सेक्युलर मुव्हमेंटचे राज्य सहसचिव प्रा.डॉ.अंबादास कांबळे,पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य समितीचे सहसचिव ऍड.मिलिंद सर्पे, डॉ.अभिजीत ओव्हळ यांनी डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
         या प्रसंगी महेंद्र नरवाडे व अनिल उमरे यांनी सामुहिक वंदना घेतली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

  यावेळी प्राचार्या शुभांगी ठमके, अनिल येरेकार, मारोती मुनेश्वर, दशरथ पवार, ऍड.यशवंत गजभारे, ऍड.जी.एस.रायबोळे, रिपाईचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश मुनेश्वर,कृष्णावंती धोटे, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश जाधव, शंकर नगराळे,  गंगुबाई परेकार, गंगाधर कदम, अंबर ठमके, मल्लूजी येरेकार, देविदास मुनेश्वर, ऍड.शामीले, सखाराम घुले, यादव नगारे, युवा पँथरचे निखिल कावळे, ऍड.सम्राट सर्पे, प्रशिक मुनेश्वर, आत्मानंद सोनकांबळे, वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील, वामन कावळे, माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, नरेंद्र दोराटे, माजी नगरसेवक प्रकाश नगराळे, विजय वाघमारे, आनंद गिमेकर, जीवन लाठे, माधव कावळे, विजय पोलासवार, किशन परेकार, ऍड.के.के.साबळे, चांगदेव सोनुले, दया पाटील, प्रा.डॉ.आनंद भालेराव, संपादक साजीद बडगुजर, पत्रकार विजय जोशी, माधव नगारे, पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, प्रवीण गायकवाड, सेना कार्यकर्ते मारोती सुंकलवाड, उध्दव भवरे, सुरेश शेंडे, प्रा.सुबोध सर्पे, दिगांबर मुनेश्वर, आकाश आळणे, अंकुश भालेराव, संपादक प्रशांत वाठोरे, उपशाम भगत, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, दिलीप पाटील, एन.एस. गायकवाड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. या सर्वांनी पुष्पार्पूण महामानवास अभिवादन केले.
            महापरिनिर्वाण दिनानिमित्त युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष राहूल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पँथर किनवट शाखेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 80 अनुयायांनी रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कृतीशील अभिवादन केले.





महापरिनिर्वाणदिनी गोकुंदा परिसरात महामानवास अभिवादन


गोकुंदा :
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त परिसरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
         

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, गोकुंदा


सिद्धार्थनगर, पंचशील नगर, विद्यानगर, राजर्षी शाहूनगर, वैशाली नगर व डॉ.आंबेडकर नगर येथील बुध्दविहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पार्पूण आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, गोकुंदा येथे एकत्र आले. तिथे भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके, मोहन गच्चे, देविदास मुनेश्वर, गणपत घुले, सखाराम घुले, पांडुरंग भालेराव, अॅड. के.के. साबळे, मिलिंद धावारे, भारत कावळे, बंडू भाटशंकर, प्रा.सुभाष गडलिंग, रेणूराव मुनेश्वर, समाजसेवक खंडूजी मुनेश्वर, उत्तम कानिंदे, दिलीप पाटील आदींनी राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पूण अभिवादन केले. बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. बौध्दाचार्य अनिल उमरे, प्रा. आनंद सरतापे यांनी वंदना घेतली.

बळीराम पाटील महाविद्यालयात अभिवादन



       बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.    प्राचार्य डाॅ.एस.के.बेंबरेकर,उपप्राचार्य प्रा.राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  प्रा.डॉ. पंजाब शेरे यांनी  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा. काझी    एस.एस.,प्रा.डि.पी.चेदले, प्रा.डॉ. आनंद भालेराव, डॉ. जी. बी. लांब, प्रा. उमाकांत इंगोले, प्रा.डॉ. अंबादास कांबळे, प्रा.डॉ.शुंभागी दिवे, प्रा.डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर,प्रा.किशन मिराशे, प्रा.सुलोचना जाधव, प्रा.पुरुषोत्तम येरडलावार, डॉ. लता पेंडलवार, प्रा. आम्रपाली हटकर, प्रा. गजानन वानखेडे, राजेंद्र धात्रक, दीपक खंदारे, यमुना कुमरे, आशा शिरपुरकर, लक्ष्मीबाई पुठ्ठावार आदीनी  प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

गट शिक्षणाधिकारी कार्यालय, किनवट येथे अभिवादन


गट शिक्षणाधिकारी कार्यालय, पं.स., किनवट येथे महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी ना.ना. पांचाळ अध्यक्षस्थानी होते. तर उत्तम कानिंदे व कनिष्ठ सहायक जी.जी. नैताम प्रमुख पाहुणे होते. यावेळी गट समन्वयक संजय कांबळे, विषयतज्ज्ञ बाबूराव इबितदार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. विषयतज्ज्ञ दयाल मोगरकर यांनी सूत्रसंचालन केले. मूल्यवर्धन तालुका समन्वयक सतीश मुलगीर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विषय शिक्षक दत्ता मुंडे, गोविंद बिच्चे, दिलीप मुनेश्वर, ओंकार गोदगिरे, परिचर त्रिगुणाबाई कागणे व बाळू कवडे उपस्थित होते.

जि.प. प्राथमिक शाळा आंजी येथे अभिवादन



           जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. सुरवातीला पुष्पहार अर्पण करुन बुध्द वंदना घेण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चरणसिंग चाहेल हे अध्यक्षस्थानी होते ;तर प्रमुख पाहुणे म्हणून भगवान कांबळे हे होते. ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न आहे. घटनेच्या माध्यमातून देशाचं कल्याण साधून जग आणि युवा पिढीसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या  ज्ञानाच्या महासागरास विनम्र अभिवादन...अश्या शब्दात मुख्यध्यापक रविंद्र चौधरी यांनी आपले विचार मांडले. तसेच शशिकांत कांबळे यांनी देखील विद्यार्थांना बाबासाहेबांनी भारतीय लोकांच्या कल्याणासाठी व स्त्रीयांच्या सन्मासाठी केलेले कार्य सांगितले.

" घायाळ पाखरांना पंख दिले तू ,
मुक्या वेदनांना शब्द दिले तू ,
तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला,
युगा युगाच्या शोषितांचा उद्धार तूच केला ,
हे महामानवा,
तुज कोटी कोटी
वंदना .....!!!
हे गीत गाऊन
विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर
महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला

महात्मा फुले विद्यालयात  जोतिबा फुले स्ममृतीदिन व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा



गोकुंदा येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालयात क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांचा स्ममृतीदिन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात अाला. जेष्ठ पर्यवेक्षक शेख हैदर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक महेंद्र नरवाडे, किशोर डांगे, अशोक भरणे, गौतम दामोदर, अंबादास जुनगरे, तुळशीराम वाडगुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        प्रारंभ मीनाक्षी राठोड व सपना यांच्या' येरे भीवा' या गीताने झाला. यावेळी श्रीकांत राठोड, प्रियंका चव्हाण, विश्वास पाटील, सुजल राठोड, अाकांक्षा कोतुरवार यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी वरील महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच  गौतम दामोदर,अशोक भरणे व शेख हैदर यांचीही समयोचित भाषणे झाली .  स्वरांजली कांबळे यांनी श्रद्धांजली गीत गायीले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा नगारे यांनी केले ; तर बंडू भाटशंकर यांनी उपस्थितांचे अाभार मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News