किनवट :
येथील जिल्हा परिषद ( मुलांचे ), हायस्कूल येथे नयाकॅम्प, किनवट केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच विविध ज्ञानवर्धक उपक्रम राबवून उत्साहात संपन्न झाली. यावेळी रवि नेम्माणीवार व वर्षाराणी नेम्माणीवार यांनी केंद्र शाळेस एलईडीटीव्ही भेट दिला.
मुख्याध्यापक मोहन जाधव अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी ना.ना. पांचाळ, केंद्र प्रमुख रमेश राठोड , उत्तम कांनिदे, पद्दोनत मुख्याध्यापक अशोक नेवळे, रवी नेम्मानिवार, गटसमन्वयक संजय कांबळे, विषयतज्ज्ञ दयाल मोगरकर, मूल्यवर्धक तालुका समन्वयक सतीश मुलगीर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी माान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्र निर्माते भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पून विनम्र अभिवादन करण्यात आले. रामस्वरूप मडावी यांनी सूत्रसंचालन केले. डीआईसीपीडी नांदेडने यांनी तयार केलेल्या पीपीटीचे निकम व अनंतवार या सीआरजी सदस्यांनी सामाजिक शास्त्र अध्ययन निष्पती या विषयावर मार्गदर्शन केले.
दुस-यासत्रामध्ये दीक्षा अॅपचा अध्यापनात वापर या विषयी सचिन कोंडापलकुलवार यांनी माहिती दिली. केंद्रप्रमुख रमेश राठोड यांनी सगुन विषयावर माहिती व प्रशासकीय सूचना दिल्या. नयाकॅम्प, किनवट अंतर्गत मराठी माध्यमाच्या पंचेवीस शाळेतील सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
दिवंगत शिक्षक मंगेश दासरवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिक्षक नेते रवी नेम्माणीवर व रेणूकादेवी शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन वर्षाराणी नेम्माणीवार - दासरवार यांनी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा,नयाकॅम्प, किनवट ही शाळा डिजीटल करण्यासाठी एल. ई.डी.टी.व्ही.भेट दिली. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी समशेर खान,नवनाथ कोळनुरे, मारोती मुलकेवार, अमोल उत्तरवार आदिंनी परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment