जिल्हा परिषद नांदेडच्या ' आमची प्रतिभा ' वर साहित्यिक नासा येवतीकर यांची कविता झळकली - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 9, 2019

जिल्हा परिषद नांदेडच्या ' आमची प्रतिभा ' वर साहित्यिक नासा येवतीकर यांची कविता झळकली




धर्माबाद ( नांदेड ) : 
येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे पदवीधर विषय शिक्षक तथा साहित्यिक नासा येवतीकर यांची 'समजदार नागरिक ' ही कविता जिल्हा परिषद नांदेडच्या 'आमची प्रतिभा ' वर झळकली आहे. या बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसह इतर विभागातील साहित्य प्रतिभा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आमची प्रतिभा हा खुला काव्य मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. दररोज एका कर्मचाऱ्यांच्या प्रतिभेला संधी मिळत असून त्यांची प्रतिभा या उपक्रमाच्या निमित्ताने प्रकाशात येत आहे. दर्जेदार कविता जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या अभ्यंगतांना वाचण्यास मिळत आहे. नासा येवतीकर हे धर्माबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत पदवीधर विषय शिक्षक असून गेल्या 25 वर्षापासून ते साहित्य लेखन करत आहेत. आजपर्यंत त्यांचे विविध लेख, कथा आणि कविता अनेक वृत्तपत्रात आणि मासिकातून प्रकाशित झाले आहेत. ते उपक्रमशील शिक्षक असून त्यांचा शिक्षणाची वारी मध्ये देखील सहभाग होता. नासा येवतीकर यांची 'समजदार नागरिक ' कविता या उपक्रमात झळकल्याबद्दल धर्माबाद तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एल. एन. गोडबोले, प्रस्तुत शाळेचे मुख्याध्यापक एम. एन. कागेरू, शिक्षण विस्तार अधिकारी तथा साहित्यिक व्यंकटेश चौधरी,  DICPED चे बालासाहेब कच्छवे, संतोष केंद्रे, उदयकुमार शिल्लारे, रमेश इटलोड, क्रांती बुद्धेवार, साईनाथ सायबलू, किरण रणवीरकर, साई पाटील, नंदकुमार राजमल्ले, माधव हिमगिरे, ए. एच. सय्यद, अशोक कागेरू, अरुण ऐनवाले, साईनाथ कामिनवार, कैलास शिंदे, राजेश जेठेवाड, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर, मिलिंद जाधव, उत्तम कानिंदे, विलास कोळनूरकर, व्यंकटेश काटकर, राजू भद्रे, अरविंद कुलकर्णी, विनायक काकुळते, श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे, सौ. अनिता दाणी, सौ. एम. डी. जोशी, अनिता जावळे आदींनी त्यांच्या साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News