बाबासाहेब शिकवाल का...?
-प्रा.नंदू वानखडे ,
तुम्हा ,भिमानं जे काही दिलं..
अरे, ते तरी..टिकवाल का..?
जीव लावूनी आपल्या मुलांना
बाबासाहेब..शिकवाल का..?"
'नाही ऊद्याला काही खरं..
हक्क काढायला लागलेत बरं..!'
हात घातलाय घटनेवर..
'करा सतर्क आपली पोरं...!"
'करून अभ्यास वर्तमानाचा
मनुवाद्यांना झुकवाल का...?"
' जिव तोडून आपल्या मुलांना..
'बाबासाहेब' शिकवाल का...?.
' त्यांचा संविधानावर आहे दात..
तुम्हा गुंतवले ' स्मारकात..
' क्रमाक्रमाने तुमचा ' घात...
त्यांनी लिहले..अजेंड्यात..!'
या बारीनं चुकलेत तुम्ही..
पुढच्या 'बारीला चुकवाल का..?
जीव लावूनी आपल्या पोरांना... 'बाबासाहेब शिकवाल का..?"
'तुम्ही डोळ्यात ' सलता..बरं..
जातीभेदाचा हा...कंकर..
गेली जखम ती खोलवर..
करा ईलाज तो लवकर...!'"
आपल्या डोळ्यात आले जे पाणी..
एकजुटीने,सुकवाल का.?
जीव लावून आपल्या मुलांना..
बाबासाहेब,शिकवाल का..?
-प्रा.नंदू वानखडे ,
मुंगळा जि.वाशिम
9423650468




No comments:
Post a Comment