माझ्या मुलीच्या हत्येनंतर मी बौद्ध धम्म स्वीकारला -सुरेश सकट, भिमाकोरेगाव. - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, December 21, 2019

माझ्या मुलीच्या हत्येनंतर मी बौद्ध धम्म स्वीकारला -सुरेश सकट, भिमाकोरेगाव.



(-डाँ.ईंजि. विवेक मवाडे )
भिमा कोरेगांव :
येथील रहिवासी व आंबेडकरी कार्यकर्ता  सुरेश नानासाहेब सकट यांनी  सरपंच व पंचक्रोशीतील ग्रामस्थ  यांच्या "गांव बंद  "मध्ये भाग घेतला नाही व सालाबाद प्रमाणे "स्फूर्ती  स्तंभाला" सलामी देण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायींना पाणी व अन्नदान देण्याचा उपक्रम सुरूच ठेवला म्हणून त्यांचे घर व हॉटेल  जाळण्यात आले .त्या हल्ल्याची प्रत्यक्ष साक्षीदार कुमारी पूजा सुरेश सकट हिस ठार मारण्यात आले. माझ्या मुलगा जयदीप यास खोट्या गुन्ह्यात अटक केली .सून हिच्यावरही हल्ला केला गेला. कोरेगांव भिमा येथे मी सुमारे 15 वर्षापासून सा.बा .च्या जागेत राहतो .येथील धनधांडगे व  माजोरी ठेकेदाराच्या अत्याचारास बळी पडलेल्या परजिल्हयातील मजुरांना कायदेशीर सहकार्य करतो याचा राग मनात धरून "ग्राम पंचायत कोरेगांव भिमा " यांनी 2014 रोजी मला गावांत राहण्यास बंदी असावी , म्हणून ठराव पारित केलेला आहे .कोरेगांव भिमा ग्राम पंचायत हद्दीत मातंग -मांग गारुडी यांची वस्ती असून आज पर्यत त्यांना राजकीय संधी दिली नाही .आंम्ही सगळेच "हिंदू "आहोत .मी , हिंदू असल्याने फाल्गुन व अनेक अमावस्याना "मिलिंद एकबोटे "च्या हिंदू जन जागृत समितीच्या कार्यक्रमांना हजर राहिलो आहे .मी  मिलिंद ऐकबोटे यांना प्रत्यक्ष ओळखतो व ते सुध्दा मला नावानिशी ओळखतात ."  पेरने फाटा येथील सोनई हॉटेल मध्ये मिलिंद ऐकबोटे व त्यांचे कार्यकर्ते जमून  वढू (बुद्रुक ) मधील 'छत्रपती संभाजी राजे व भिमा कोरेगांव शौर्य स्तंभा'चा इतिहास बौद्ध,महार खोटा सांगत आहेत त्याला विरोध केला पाहिजे  , वढू येथे अनेक वेळा "मनोहर भिडे "येत असत. त्यांच्या अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहून ऐकले आहे .मागील अनेक दिवसांपासून  "भिमा कोरेगांव विजयी स्तंभ व वढू येथे छत्रपती संभाजीराजे समाधी , 'गोविंद गोपाळ महार' यांना अभिवादन करायला आलेल्या लोकांना धडा शिकवला पाहिजे , असा अपप्रचार होत होता, त्याबाबत मी शीक्रापूर पोलिसांना लेखी माहीतीही दिली आहे . अँड .किरण चन्ने यांनी 'सुरेश नानासाहेब सकट म यांची उलट तपासणी घेतली , त्यांनी आपला धर्म हा हिंदू होता , मी मातंग समाजाचा असून अंग मालिश व हॉटेल  चालवून  परिवाराचा उदरनिर्वाह करत असतो असे सांगीतले होते. माझ्या मुलीच्या हत्येनंतर मी बौध्द धम्म स्विकारला असे सुरेश सकट यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News