डॉ.बबन जोगदंड यांच्या पुढाकाराने दुबईत होणार महाराष्ट्रातील 30 जणांचा गौरव! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, January 24, 2020

डॉ.बबन जोगदंड यांच्या पुढाकाराने दुबईत होणार महाराष्ट्रातील 30 जणांचा गौरव!


पुणे : यशदा येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील 30 जणांना दुबईमध्ये लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे.
   बुलढाण्यातील  रहिवासी असलेले दुबईस्थित उद्योजक  डॉ.भगवान गवई यांच्याशी सिटॅक्स एनर्जी या कंपनीमार्फत महाराष्ट्रामध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तीस ते पस्तीस अधिकारी- कर्मचारी तसेच सामाजिक,राजकीय प्रशासकीय क्षेत्रात काम करणारे  यांना यावर्षी लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड देऊन गौरवण्यात येणार आहे. यामध्ये पांडुरंग शेलार ,इ.झेड. खोब्रागडे, महावीर माने,रामचंद्र जाधव, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. विजयकुमार माहुरे,डॉ. राजेश मोरे,अशोक शिरसे रमेश चव्हाण, सुदेश गायकवाड, ज्योती पाचरणे डॉ. आदिती पाचरणे, डॉ. डी. टी गायकवाड, अनिल इंगोले, राहुलकुमार हिंगोले, डॉ. संतोष तावरे प्रा. एस.के. जोगदंड, पी. ई. गायकवाड,  प्रीतिश चौधरी,  संतोष बोराडे,अनिल लोने, अनंतकुमार वेडे, विश्वास रायबोले,सुदर्शना त्रिगुणाईत, अरुण पवार,अंबादास आरोळे, सुभाष चांदेरे,  दयाराम राठोड, रमेश चव्हाण अतुल गुगले, दिलीप बारणे यांच्यासह  अन्य मान्यवरांचा सहभाग आहे.
यावर्षी हा कार्यक्रम दुबईतील मीडिया रोटाना या पंचतारांकित हॉटेलमध्ये 2 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला दुबई-स्थित विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून जवळपास 58  लोक येत आहेत.त्यामध्ये काहीजण आपल्या कुटुंबासह सामील होत आहेत. गतवर्षीही अशाच प्रकारचा कार्यक्रम दुबईमध्ये घेण्यात आला होता.त्यावेळी 51 जण सहभागी झाले होते त्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित झाले होते. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा दुबईत सन्मान व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती डॉ.बबन जोगदंड यांनी दिली. या कार्यक्रमाचे दुसरे नियोजक  राहुलकुमार भातकुले हे आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News