नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा 4 फेब्रुवारी 2020 पूर्वी तंबाखूमुक्त कराव्यात -शिक्षणाधिकारी ( प्रा. ) प्रशांत दिग्रसकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, January 27, 2020

नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा 4 फेब्रुवारी 2020 पूर्वी तंबाखूमुक्त कराव्यात -शिक्षणाधिकारी ( प्रा. ) प्रशांत दिग्रसकर


नांदेड :
 जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची जिल्हा प्रशिक्षण संस्था येथे सलाम मुंबई फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण संचनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या तंबाखू मुक्त शाळा अभियाना अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी( प्राथमिक ) प्रशांत दिग्रसकर , तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षण अधिकारी  बालासाहेब कुंडगिर  , प्राचार्या डॉ. जयश्री आठवले, उपशिक्क्षणाधिकारी बंडू आमदूरकर , सलाम मुबंई फाउंडेशनचे प्रकल्प संचालक  अजय पिळणकर  , प्रा. देशमुख, प्रा. धुमाळ आदी मंचावर उपस्थित होते. या सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंबाखु मुक्त शाळा अभियानाचे नांदेड चे जिल्हा समनव्यक रवी ढगे यांनी केले. त्यांनी आपल्या जिल्ह्यातील तंबाखुमुक्त शाळा या अभियान अंतर्गत 3445 पैकी 442 शाळा अॅपवर आहेत ; तर 200 शाळा तंबाखुमुक्त झाल्या असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील  उर्वरित शाळा तंबाखुमुक्त होण्यासाठी सर्वांनी प्रमाणिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी  बालासाहेब कुंडगिर  यांनी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा ह्या तंबाखुमुक्त लवकरात लवकर कश्या होतील यासाठी सर्वांनी मिळून काम करून हे अभियान यशस्वी करावे असे सांगितले. अध्यक्षीय समारोप करतांना प्रशांत दिग्रसकर म्हणाले, आपला जिल्हा तंबाखूमुक्त शाळा अभियानात गतिमान होण्याची गरज असून येणाऱ्या पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी हे अभियान संजीवनी असून यात  गेली अनेक वर्षे झाली या अभियानास सक्रिय काम करणारे जिल्हा समनव्यक रवी ढगे, सलाम मुंबई फाउंडेशनचे सचिन वानखेडे , मारोती पवार यांचे अभिनंदन केले व  सर्वानी सक्रीय सहभागी होऊन, सर्व केंद्रप्रमुख यांचा आढावा घेऊन ज्या केंद्रप्रमुखां आपले केंद्र तंबाखुमुक्त शाळा  केले त्यांचे अभिनंदन केले. येणाऱ्या 4 फेब्रुवारी 2020 पूर्वी सर्व केंद्र प्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळा तंबाखु मुक्त शाळा म्हणून सलाम मुंबई फाउंडेशनने दिलेले 11 निकष मोबाईल अॅपवर भरून टाकावेत यासाठी मी स्वतः 15 दिवसाला आढावा घेणार असल्याचे सांगितले. शेवटी मेणबत्ती पेटवून तंबाखुमुक्त शपथ सर्वांना देण्यात आली.  अर्धापुर येथील  उपक्रमशील पुरस्कार प्राप्त शिक्षक मारोती पवार यांनी त्यांच्या वतीने स्वतःच्या खर्चाने तंबाखुमुक्त शाळा बॅनरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर  सलाम मुंबई फाउंडेशनचे सचिन वानखेडे यांनी 11 निकष सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पवार यांनी केले. संस्था प्रतिनिधी कैलास गायकवाड यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News