लोणी, आंजी व मोहपूर शाळेत विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, January 27, 2020

लोणी, आंजी व मोहपूर शाळेत विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लोणी, आंजी व मोहपूर शाळेत विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


किनवट :
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या लोणी, आंजी व मोहपूर शाळेत प्रजासत्ताक दिन ध्वजारोहन, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेह भोजन अशा विविध कार्यक्रमाच्या आयोजन उत्साहात साजरा करण्यात आला.
               कमठाला केंद्रातंर्गत जिल्हा परिषद लोणी शाळेत प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमाने चांगलीच रंगत आल्याने उपस्थितांनी बक्षिसांचा वर्षाव केला.
                  प्रजासत्ताक महोत्सव -२o२o चे उदघाटन परिक्षेत्र मोरगावचे प्रभारी शिक्षणविस्तार अधिकारी शिवाजी खुडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप गुंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन शाहिन बेग ह्यांनी केले ; तर विद्या श्रीमेवार या उपक्रमशील शिक्षिकेने आभार मानले.
                  सांस्कृतीक कार्यक्रमात स्वागतगीत, कविता, गीत गायण, भाषणणासह गोंडीनृत्य, भांगडानृत्य, जोगवानृत्य, कोळीनृत्य, देशभक्ती गीतावर नृत्य, छत्रपती शिवरायांच्या गीतावर नृत्य आदि गीतावर नृत्य करून विद्यार्थ्यांनी वाहवा मिळवली. कार्यक्रमास बहूसंख्येने माता - पालक उपस्थित होते.
               

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा


किनवट :
 जि. प. प्रा. शा. आंजी येथे सर्व विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी शिक्षकांसमवेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या उद्देशिकेच वाचन व विविध प्रकारच्या उपक्रमाने ध्वजारोहण करून साजरा केला   सुरवात प्रभातफेरीने केली. गेली देशभक्तीपर घोषणांनी परीसर दणाणून गेला. गावकरीही त्यात सहभागी झाले. नंतर शाळेचे मुख्याध्यापक  रविंद्र चौधरी यांनी ध्वजारोहण केले. तद्नंतर भाषण स्पर्धा झाल्या . यात 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलांच्या भाषणांनी गावकरी मंत्रमुग्ध झाले व मुलांना बक्षीसपण रकमेच्या रुपात दिले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने क्रीडास्पर्धा झाल्या होत्या ; त्याचे बक्षीस  सरपंच रेणुकाबाई रनमले, मारोती रनमले,उपसरपंच दयाराम जाधव,पोलिस पाटील धरमसिंग चायल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चरणसिंग चायल व ज्यांच्याकडुन बक्षीस मिळाले असे साथी अमृततुल्य चहा किनवट या शॉपचे मालक रुपेश पाटील व चरणसिंग चायल या सर्वांच्या हस्ते बक्षीस वाटप झाले . तसेच गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार ही शाळेकडून झाला. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यांचे नियोजन शाळेचे सह शिक्षक  शशिकांत कांबळे यांनी केले. छत्रपतीशिवरायांचे स्वराज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रुपात दिले.असे विचार मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. शेवटी मुलांना ग्रामसेवक  पिराजी झटकवडे यांनी खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदित्य कऱ्हाळे,गोपाल कऱ्हाळे साहेबराव शेळके यांनी परिश्रम घेतले.

 जिल्हा परिषद केंद्रीय प्रा. शाळा मोहपुर येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा


किनवट :
सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाची माहीती देत सहशिक्षक राहुल तामगाडगे यांनी कार्यक्रमाची सुरवात केली. जितेंद्र आमटे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व त्या नंतर सुत्रसंचालन सांभाळले... वासुदेव राजुरकर व संच यांनी देशभक्ती पर गित सादर केले... त्यांनतर प्रतीमेचे पुजन करुन संविधान उद्देशिका चे वाचन करण्यात आले.  ध्वजारोहणासाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेश आंधळे व शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष दिगांबर खुडे यांना पाचारण करण्यात आले.
           शालेय व्यवस्थापन समीतीचे उपाध्यक्ष धरत्रीनाथ शिरडे यांच्या तर्फे आनंद नगरीतील सहभागी सर्व विद्यार्थाना बक्षिस वितरीत करण्यात आले.
                    दिनांक 21 जानेवारीपासुन विवीध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या, त्यात सहभागी विजयी स्पर्धकांना शाळेतर्फे बक्षिस वितरीत करण्यात आले. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समीती अध्यक्ष दिगांबर खुडे व उपाध्यक्ष धरत्रीमाथ शिरडे यांच्या कडुन शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समीती सदस्य, मोहपुर येथील सर्व कर्मचारी व ग्राम पंचायतचे सर्व सदस्य यांना स्नेहभोजन देण्यात आले.
                 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक सुभाष सोनटक्के , गणपत किनाके , शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी पुढाकार घेतला.सहशिक्षक सुभाष सोनटक्के यांनी शेवटी सर्वाचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News