किनवट :
२०२१ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत SC, ST प्रमाणे OBC ( VJ-NT, SBC, SEBC- मराठा) इत्यादी प्रवर्गाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करणे व इतर महत्त्वाच्या विषयाबाबत मुख्यमंत्री यांना केलेल्या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड तर्फे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात केलेल्या मागण्या : १) शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याचा कायदा करावा,२) विनाअट सातबारा कोरा करून शेतकरी कर्जमुक्त व चिंतामुक्त करावा,३) शेतकऱ्यांना दर वर्षी पेरणीपूर्वी एकरी १००००/-अनुदान द्यावे,४) छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबई येथील स्मारक राजभवनाच्या जागेवर अथवा इतर जमिनीवर उभारण्यात यावे,५)ग्रामपंचायत सदस्य ते मुख्यमंत्री (सर्व लोकप्रतिनिधी) व गावातील कोतवाल ते मुख्य सचिव (सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी) यांची मुले जिल्हापरिषद व महानगरपालिकेच्या सरकारी शाळेतच शिकवावेत असा कायदा करावा,६) छत्रपती शिवरायांची बदनामी करणारे पुस्तक " आज के शिवाजी- नरेंद्र मोदी" यावर तात्काळ बंदी घालावी व लेखक , प्रकाशक, मुद्रक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,७)शिवजयंती दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बहुजन समाजातील योग्य व्यक्तीला महाराष्ट्रभूषण पुरस्कार दरवर्षी द्यावा.
या मागण्या संभाजी ब्रिगेडने सरकारकडे केल्या आहेत.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवश्री बालाजी पाटील सिरसाट, संभाजी ब्रिगेड किनवट तालुकाध्यक्ष शिवश्री सचिन पाटील कदम, शहर उपाध्यक्ष आकाश इंगोले, अरविंद पाटील सूर्यवंशी, साई पालेपवाड, प्रतीक कानवटे, राजेश कदम, रितेश मंत्री आदी उपस्थित होत.




No comments:
Post a Comment