ज्ञानवाहिनीला गतवैभव मिळविण्यास सर्वांनी एकत्र येऊन नवी आखणी करण्याची गरज -जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, January 20, 2020

ज्ञानवाहिनीला गतवैभव मिळविण्यास सर्वांनी एकत्र येऊन नवी आखणी करण्याची गरज -जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर



किनवट : 
जिथं खेळलो, बागडलो, घडलो तिथं जुन्या सवंगड्यासह आज त्या काळच्या आठवणीत रमलो. या शाळेत असतांना दिल्लीत राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात आम्हाला सहभागी होता आलं, याचा मनस्वी आनंद आहे. ज्ञानवाहिनी असलेल्या शाळेला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आता नवी आखणी करण्याची आवश्यकता आहे. तरच येथील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत यशवंत झाल्याचं पाहण्यासाठी आपल्याला दरवर्षी असच एकत्र यायचं आहे. असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तथा ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.
         संत तुकाराम महाराज सभागृह, जिल्हा परिषद हायस्कूल ( मुलांचे ), किनवट येथे रविवारी ( ता. १९ ) सकाळी १० वाजता आयोजिलेल्या 'माजी विद्यार्थी स्नेहमिलन '  सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. माजी विद्यार्थी तथा माहिती उपसंचालक मोहन राठोड अध्यक्षस्थानी होते. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, तहसिलदार नरेंद्र देशमुख, माजी विद्यार्थी तथा पाथरीचे तहसिलदार उत्तम कागणे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, डॉ. अशोक बेलखोडे, माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान, व्यंकटराव नेम्माणीवार, के. मूर्ती, साजीद खान, प्रा. किशनराव किनवटकर, निवृत्त गट शिक्षणाधिकारी अरूण वतनीवकील, शंकर राठोड, निवृत्त शिक्षक रामराव पत्की, अभियंता नरसिंग यनगंटवार, उद्योजक गजानन कोट्टावार, सटलावार, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
        आयोजक मुख्याध्यापक मोहन जाधव यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पार्पूण दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.

        प्रा.आम्रपाली वाठोरे यांच्या संचाने स्वागत गीत गाईले. सरस विद्यालय, मांडवीच्या विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर केले. पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर भारतीय साहित्य अकादमीने ज्यांचे नाटक प्रकाशित केले ते नाटककार तथा माजी विद्यार्थी प्रा.डॉ. अंबादास कांबळे यांनी त्यांचा श्वानपुरान एकांकिका संग्रह सर्व मान्यवरांना भेट दिला. दिवंगत माजी शिक्षक व विद्यार्थ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

        पुढे बोलतांना नार्वेकर म्हणाले, मी येथे जिल्हाधिकारी म्हणून नव्हे तर या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून आलो आहे. किनवटचे दिवस चांगले होते. जिल्हा परिषद शाळेचा  विद्यार्थी म्हणून सर्वत्र सांगतांना मला कुठेही कमीपणा वाटला नाही. दिवंगत खासदार उत्तम राठोड यांचे त्याकाळी शाळेकडे विशेष लक्ष होते.सबनीस सरांनी इंग्रजी, पत्की सरांनी आमचे गणित पक्के केले. हिंदी, गीत, नाट्यवेडे बलदेवसिंह चौहन सर हे तर प्रचंड उर्जेनं भरलेला धबधबा... या सर्व गुरुजनांच्या प्रेरणेने आम्ही पुढं पुणे विद्यापीठात गेलो. तिथे आमचा समुह किनवट गँग म्हणून चांगल्या लौकिकानं गाजला. येथील माजी विद्यार्थी अनेक महत्वाच्या हुद्यावर आहेत. कला, क्रीडा,नाट्य, उद्योग अशा विविध क्षेत्रात आज पाय रोऊन बसली आहेत. यांच्यास सहकार्यातून या शाळेला नवं रूप द्यायचं  आहे.आम्ही परिपूर्ण प्रयोगशाळा द्यायला तयार आहे. शिक्षक विद्यार्थी संवाद संपत चाललाय. अशा स्थितीत येथील शिक्षकांनी आता फक्त जीव ओतून काम करायचं आहे.

        अध्यक्षीय समारोप करतांना मोहन राठोड म्हणाले, ज्येष्ठ पत्रकार म.आ. चौधरी व रोज बातम्या सांगणाऱ्या गुरूजीमुळं मी पत्रकारितेकडे वळलो. आपलं उज्ज्वल भवितव्य घडवायला एक आयडॉल समोर ठेवावा लागतो. या शाळेतून जिल्हाधिकारी झालेले राजेश नार्वेकर आपले आयडॉल आहेत. यांना आता आपले अॅम्बेसेडर बनवून येथील विद्यार्थी घडवायचे आहेत. ट्रस्टच्या स्थापनेतून या जिल्हा परिषद शाळेचा आपल्याला कायापालट करून दाखवायचा आहे.
        प्रत्येक वर्षाच्या इयत्ता दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. उपस्थित प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना प्रशस्ती -पत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात सरस्वती विद्या मंदीर, रतनीबाई राठोड, सुमतीबाई हेमसिंग नाईक, जिल्हा परिषद कन्या शाळा, मुलांचे व मुलींचे हायस्कूल या शाळांच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक मराठमोळी वेशभूषा परिधान करून लेझीम पथकासह सहभाग घेतल होता.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी ना. ना. पांचाळ, केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार, अशोक नेवळे,जीवन गुरनुले, अनिल येरेकार, दिलीप कांबळे, नवनाथ कोळनुरे, रमेश राठोड, समशेर खान, रामस्वरूप मडावी, रुख्मिनी मेश्राम आदिंनी पुढाकार घेतला.

            कार्यक्रमास धरमसिंग राठोड, शिवराज राघूमामा, अखिल खान,अर्जून आडे, अशोक नेम्माणीवार, नवीन राठोड, अखिल खान, सुधाकर भोयर, व्यकंटराव भंडारवार, भाऊराव जाधव, अॅड. उदय चव्हाण, कमलाकर कंचर्लावार, गिरीश नेम्माणीवार आदीं मान्यवरांसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, उद्योगपती, व्यापारी झालेले
बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News