सदाशिव गच्चे यांना " डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार " जाहीर मुकनायकच्या शताब्दीनिमित्त 31 रोजी दीक्षाभूमीवर होणार वितरण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, January 28, 2020

सदाशिव गच्चे यांना " डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार " जाहीर मुकनायकच्या शताब्दीनिमित्त 31 रोजी दीक्षाभूमीवर होणार वितरण


नांदेड :
 युगंधर क्रिएशन, वंदना संघ दीक्षाभूमी, व लॉर्ड बुद्धा मैत्रीसंघ नागपूरच्या वतीने दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा "डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार" प्रसिध्द संगीतकार तथा लॉर्ड बुद्धा टी.व्ही.चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे  यांना जाहीर झाल्याने सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
          भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 मध्ये काढलेल्या "मूकनायक" या वृत्तपत्राला शंभर वर्षे पूर्ण होत असल्यामुळे पत्रकरितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील पत्रकारांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारीता पुरस्कार देवून युगंधर क्रिएशन नागपूर, वंदनासंघ दीक्षाभूमी,नागपूर व लॉर्ड बुद्धा मैत्रीसंघ नागपूरच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. यावर्षीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार लॉर्ड बुद्धा टी.व्ही.चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांना जाहीर  करण्यात आला असल्याची माहिती संयुक्त पुरस्कार निवड समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
              सदाशिव गच्चे यांनी लॉर्ड बुद्धा टी.व्ही. या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षाहून अधिक काळापासुन पत्रकारिता, सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक व संगित क्षेत्रात  दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल 31जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता  नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर  मान्यवरांच्या हस्ते  त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
            सदाशिव गच्चे हे नावाजलेले संगीतकार असून त्यांनी संगीतबध्द केलेल्या ध्वनीमुद्रिकेस प्रख्यात गायक गायक महेंद्र कपूर यांनी आवाज दिला आहे. दखल चळवळीचे निर्माते आणि प्रसिध्द नाटककार, गीतकार तथा आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी अमर रामटेके यांच्या ह्रदयस्पृशी भावगीतास सदाशिव गच्चे यांनी संगीत दिले असून ती ध्वनीमुद्रीका एक अनोखा ठेवा ठरली आहे. नांदेडच्या सांस्कृतिक वाटचालीत 'बुध्द पहाट ' संकल्पना प्रत्यक्ष रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. बुध्द-भीम जयंतीच्या निमित्त अनेक प्रख्यात गायकांसह नवोदित कलावंतांना सोबत घेऊन त्यांनी अख्खा मराठवाडा पिंजून काढला होता. लॉर्ड बुध्दा टी.व्ही वरील 'चमकते सितारे मिले गावमें हमारे' हा आंबेडकरी संगीत क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखतींचा त्यांनी निर्मिलेला व सादर केलेला कार्यक्रम सगळ्यांच्या मनात ठसला आहे.
            सदाशिव गच्चे यांना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्धल मराठी पत्रकार परिषद मुंबईचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव सुभाष लोणे, नमस्कार महाराष्ट्रचे संघरत्न पवार, स्वामी रामानंद विद्यापीठ माध्यम संकुलाचे प्रा.राजेंद्र गोणारकर,शिक्षक व कर्मचारी संघटनेचे केंद्रीय जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, साहित्यिक भीमराव हाटकर, राहुल जोंधळे, महाविहार परिवाराचे साहेबराव पुंडगे आदींनी सदाशिव गच्चे यांचे अभिनंदन केले आहे.

" आंबेडकरी चळवळीत व संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे सदाशिव गच्चे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता राज्यस्तरीय पुरकार प्रदान होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. त्यांना माझ्या इब्टा परिवारातील सर्व सदस्यांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा ! "
-बाळासाहेब लोणे, केंद्रिय जिल्हाध्यक्ष,इब्टा, नांदेड

" निरपेक्षपणे सतत काम करत राहायचं हा आमचा सिरस्ता. आम्ही कधीच पुरस्काराच्या मागे धावलो नाही. यापूर्वी अनेक संस्थांनी पुरस्कार देण्याचं ठरविलं होतं. परंतु आम्ही नम्रपणे ते नाकारलं. परंतु आता मिळणाऱ्या पुरस्काराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. डॉ. बाबासाहेबांनी जे ' मूकनायक ' काढलं त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेला हा पुरस्कार पवित्र अशा दीक्षाभूमीवर मिळतोय याच्यापेक्षा मोठा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा दुसरा कोणता क्षण नाही. "
-सदाशिव गच्चे, नांदेड
(94217 56663)

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News