मंदिर नको शिक्षणाचे द्वार पाहीजे..!
-प्रा.नंदू वानखडे
आम्हा हाती ,आता ना तलवार पाहीजे
बुध्दीला त्या ,तलवारीची 'धार' पाहीजे..!'
मंदीर नको, शिक्षणाचे द्वार पाहीजे
फळ्यावरी हाच, 'सुविचार 'पाहीजे..
सोमवार ,शुक्रवार...पुरे आता
अंधश्रध्देवरती, 'नवा वार 'पाहिजे....!
अंधश्रध्देवरती, 'नवा वार 'पाहिजे....!
बुध्द आहे,नको मला युध्द आता
शहाण्याला शब्दाचाच 'मार 'पाहीजे..!
शहाण्याला शब्दाचाच 'मार 'पाहीजे..!
धर्म ,मेंदू सडवतो डोक्यामधी...
समतेच्या विचाराचा, 'सार' पाहीजे...!
समतेच्या विचाराचा, 'सार' पाहीजे...!
प्रवाहात वाहणारे ,मोजू किती
विरोधात तसे ,दोन' चार 'पाहीजे...!
विरोधात तसे ,दोन' चार 'पाहीजे...!
ऊत्सव रोजच ,माणसाच्या मरणाचा..
आणखी कशास, 'सण-तिवार' पाहीजे..?
आणखी कशास, 'सण-तिवार' पाहीजे..?
धर्म-निरपेक्ष 'असा न्याय हवा
धर्म 'वाणीतूनी, 'हद्दपार 'पाहीजे..!
धर्म 'वाणीतूनी, 'हद्दपार 'पाहीजे..!
दागिन्याने ,देह तुझा, सजे तसा
अंगी माणुसकीचा 'अलंकार' पाहीजे..!
अंगी माणुसकीचा 'अलंकार' पाहीजे..!
चढली जरी, धर्मवेडी नशा तुला
अहिंसेचा ,त्यावरी 'ऊतार' पाहीजे..!
अहिंसेचा ,त्यावरी 'ऊतार' पाहीजे..!
No comments:
Post a Comment