विद्यापीठस्तरीय पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत योगेश पिलंगवाडने सुवर्ण पटकावल्याने मुंबई येथे आॅल इंडीया यूनिवर्सिटी स्तरावर निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, January 24, 2020

विद्यापीठस्तरीय पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत योगेश पिलंगवाडने सुवर्ण पटकावल्याने मुंबई येथे आॅल इंडीया यूनिवर्सिटी स्तरावर निवड




उमरी ( नांदेड ) :
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत उमरी येथील योगेश दशरथ पिलंगवाडने प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदक पटकावून आपली विजयी घोडदौड कायम केली.
          गेल्या आॅक्टोबर महिन्यात पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत त्याला रौप्यपदक मिळाले होते. त्यावेळी त्याने ३४५ किलो वजन उचलले होते. परंतु जिद्द , चिकाटी, कठोर मेहनत व प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर यावेळी त्याने ३८० किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले. त्याला प्रशिक्षक  जितेंदरसिंग संधू नांदेड यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
           या स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे त्याची मुंबई येथे होणाऱ्या आॅल इंडीया यूनिवर्सिटी स्तरावर निवड झाली असून या स्पर्धेसाठी तो जय्यत तयारीला लागलेला आहे.
           सुवर्ण पदक पटकावल्यानंतर योगेशची उमरी येथे  विजयी मिरवणूक काढण्यात आली . या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News