किनवट ता.२२ फेब्रु २०२०:
भारतीय बौद्ध महासभा,शाखा अंबाडी (रेल्वे स्टेशन, ता. किनवट) च्या वतीने बुधवारी (ता.२६) महान संत चिमणाजी पाटील यांच्या ८३ व्या पुण्यतिथीनिमित्त बौद्ध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून प्रबोधनाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. याकरिता परिसरातील सर्व जनतेंनी बहुसंख्येनं उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
पहिल्या सत्रात सकाळी ९ :३० वाजता उपासक सतिष गिरीधर पाटील यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहन होईल. दुस-या सत्रात दुपारी ४ ते ७ या वेळेत भोजनदान होईल. तिस-या सत्रात सायंकाळी ५ ते ७ यावेळेत झेन मास्टर भिक्कू शाकु बोधीधम्मा, तामसी (आदिलाबाद, तेलंगाना)
यांची धम्मदेसना होईल. चौथ्या सत्रात सायंकाळी ७ ते ९ यावेळेत सुप्रसिद्ध प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन होईल. पाचव्या सत्रात रात्री ९ वाजेपासून महाराष्ट्राचे प्रसिद्ध कव्वाल संविधान मनोहरे (अमरावती) व कव्वाला धम्मज्योती शिंदे (मुंबई) यांचा बुद्ध व भीम गितांचा दणदणीत मुकाबला होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास तामगाडगे, उमेश भवरे व पंकज भवरे हे करतील. कार्यक्रमाचा समारोप गुरुवारी दि.२७ सकाळी ९ वाजता करण्यात येईल. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभि. प्रशांत ठमके, शाखाध्यक्ष सतिष गिरीधर पाटील, विशाल हलवले, विद्याधर तामगाडगे, शेंदूपान मुनेश्वर, राहुल कयापाक, कोमलदास भवरे, किशन मुनेश्वर, श्रावण घुले, सम्यक मुनेश्वर, विलास कानिंदे, कपिल हलवले यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, रमाई महीला संघ, नवयुवक मित्र संघ, शाखा अंबाडी ता.किनवट यांच्या वतीने करण्यात आले आहे.




No comments:
Post a Comment