नांदेडच्या दवाखान्यात चालणाऱ्या बोगस स्टाॅफचा काळा बाजार बंद करा ; जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे युनायटेड नर्सेस असोशियशनचे अध्यक्ष आदी बनसोडे यांनी केली मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, February 22, 2020

नांदेडच्या दवाखान्यात चालणाऱ्या बोगस स्टाॅफचा काळा बाजार बंद करा ; जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे युनायटेड नर्सेस असोशियशनचे अध्यक्ष आदी बनसोडे यांनी केली मागणी




नांदेड :नांदेडातील काही दवाखान्यात चालणाऱ्या बोगस स्टाॅफचा काळा बाजार बंद करा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे युनायटेड नर्सेस असोशियशनचे अध्यक्ष आदी बनसोडे यांनी केली असून स्वतः एम.डी. असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावर आम्ही नक्की ऍक्शन घेऊ असे आश्वासन  दिले आहे.
             जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की,
नांदेड शहरातील काही मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांची आर्थिक लुट,  पिळवणूक केली जाते, तसेच येथे ज्यांनी नर्सिंग केले नाही त्यांना दवाखान्यात काम दिले जाते.
नांदेडमधील काही खाजगी हाॅस्पिटलमध्ये बोगस स्टाॅफ रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत. ह्या दवाखाण्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
          जिल्हाधिकारी स्वतः डॉक्टर असल्यामुळे नक्कीच या बाबीकडे विशेष लक्ष देतील व नर्सिंगवर अन्याय होऊ देणार नाहीत. अशी अपेक्षा आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करतो असे भेटी प्रसंगी त्यांनी सांगितले असून याबाबत त्यांनी आयुक्तांकडे याबाबत फोनवर चर्चा केली असल्याचे समजते.
             नांदेड जिल्ह्यातील खाजगी नर्सेसच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढणारा UNA युनायटेड नर्सेस असोशियशन, रुग्ण हक्क परिषद नांदेडचे अध्यक्ष आदी बनसोडे यांच्या कार्यास खाजगी नर्सेसनी जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा द्यावा व खाजगी नर्सेसला काही अडचण असल्यास संपर्क साधावा असे आवानही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News