(दिनांक : 16 फेब्रु. 2020 रोजी महागाव जि .यवतमाळ येथील पाचव्या बौद्ध धम्म परिषदेच्या समारोपीय सत्रातील प्रेम हनवते यांच्या भाषणाचा सारांश -संपादक)
महागाव ( यवतमाळ ) :
"प्राचीनकाळी संपूर्ण भारतदेशात बौध्द धम्म वाढीस लागण्याची मुख्य दोन कारणे आहेत ती म्हणजे राजसत्ता आणि अर्थसत्ता ! महाराष्ट्र देशी सुध्दा बौध्दधम्माचा विकास झाला तो याच कारणांनी . तत्कालीन राजा महाराजा आणि सम्राटांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करुन त्यास राजाश्रय दिला .तसेच तेथील धनिक आणि व्यापाऱ्यांनी या धम्मास गतिमान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धन दिले , अनेक श्रीमंत उपासकांनी दान दिल्याचे दाखले चैत्यगृह , लेण्यांच्या शिलालेखातून पहायला मिळतात. धम्मपरिषदां आयोजित करण्यामागचा हेतू जर धम्म चळवळ गतिमान करणे हा असेल तर हे ऐतिहासिक सत्य आपण विसरून चालणार नाही .म्हणून अर्थसत्ता आणि राजसत्ता आमच्या समाजाजवळ कशी येईल याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे .तथागत बुद्धांनी दिलेल्या आठ शिलातील सम्यक अजीवीका हे एक शील आहेत .याचा अर्थ असा की प्रत्येकाने सन्मर्गाने सदविवेक बुद्धीने व्यापार , उद्योग व्यवसाय करुन स्वःताचा प्रपंच करावा आणि त्यातून कमवीलेल्या संपत्तीचा उपयोग धम्म कार्यास करावा.परंतु आज आपलाबहुतांश समाज गरीब , निर्धन आहे.अत्यंत अडचणीतून त्याला त्याचा प्रपंच करावा लागतो.त्यामुळे हा मोठा वर्ग विकासा पासून कोसो मैल दुर आहेत .हा वर्ग श्रध्दावान आहे त्यांच्या कुवतीप्रमाणे ते धम्म कार्यास पुढे नेण्यास प्रयत्नशील आहेत . त्यांची इच्छा असूनही केवल आर्थिक सुबत्ता नसल्याने पाहिजे त्या प्रमाणात धम्म कार्यास पुढे नेऊ शकले नाही ही त्यांची खंत आहे .आपल्या समाजातील तीस टक्के वर्ग हा नोकरदार , कर्मचारी, अधिकारी व्यवसायिक धनिक आहे .हा वर्ग ही मोठ्याप्रमाणात सामजिक चळवळीत आणि धम्म चळवळीत सक्रिय असून दानशूर आहे .यातील अनेक सन्माननीय उपासक तर अति दानशूर देखील आहेत.परंतु त्यांच्या ही काही मर्यादा आहेत .समाजाची आर्थिक बाजु भक्कमपणे उभीच व्हावी यांसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते , नेते आणि विचारवंत यांनी आंबेडकरी समाज आणि आर्थिक प्रश्न यांवर चिंतन करणे गरजेचे आहे .आमच्या समाजात उद्योजकता वाढीस लागून प्रोडक्शन , डिस्ट्रिब्यूशन, सप्लायर्स आणि कण्जूमर्स(ग्राहक)अशी साखळी समाजात निर्माण झाली पाहिजे .आपला समाज हा मोठा ग्राहक वर्ग आहे आणि तोच वोटर अर्थात मतदार आहे .कण्जूमर्स ते वोटर्स ही कन्सेप्ट घेऊन रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजलीने भाजपाला सत्तेत येण्यासाठी मदतच केली हे आपण विसरलो का ? आर्थिक प्रश्नांवर आपणांस नव्याने चळवळी उभ्या कराव्या लागतील.याला सपोर्टेड पतसंस्था , बँकिंग , ग्राहक भांडार, व्यवसाय मार्गदर्शन केंद्रे , उद्योजकता विकास शिबिरे , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे , प्रकाशन संस्था इत्यादी माध्यमातून आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल करावी लागेल .राजकीय क्षेत्र इतरांसाठी पुढारीपणा , मोठेपण , मानसन्मान मिरविण्यासाठी असेल परंतु आपल्या साठी मात्र ते व्यवस्था परिवर्तनाचे शस्त्र आणि शास्त्र आहे.यांसाठी आपण राजकीय जमात म्हणून पुढे आले पाहिजे .राजकारण मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा काबीज केल्या पाहिजे .आपला समाज आणि ईतर सर्व समदुखी बहुजन समाजासोबत जिव्हाळ्याचे , आपुलकीचे आणि आत्मीयतेचे संबन्ध निर्माण केले पाहिजे .एकमेकांचे दोष काढत बसण्यात काही अर्थ नाही ते दोष दुर करुन , कडवटपणा दुर करुन सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचा प्रयत्न आपण करूया .जाती सोबतच जाणिवेची माणसे जोडत गेलो तर नक्कीच आपण एकदिवस राजसत्ता देखील हस्तगत करू शकतो .संघटना हीच खरी ताकद असते .यांनी काहीच केले नाही , त्यांनी काय केले ? आता काहीच होऊ शकत नाही असे निराशावादी विचार सोडून आपण सर्व मिळून करू या ..होऊ शकते ..अजून वेळ गेली नाही असा आशावादी , सकारात्मक विचार घेऊन आपण सुरवात तर करू या !
"कोन कहेंता के असमान में सूराग नही होता ?
एक पत्थर तों तबियतसे उछालो यारों ! !




No comments:
Post a Comment