आपली भूमिका जबाबदारीने पार पाडल्यास निश्चितच मानसिकदृष्ट्या निरोगी समाज निर्माण होईल -प्राचार्या शुभांगी ठमके - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, February 17, 2020

आपली भूमिका जबाबदारीने पार पाडल्यास निश्चितच मानसिकदृष्ट्या निरोगी समाज निर्माण होईल -प्राचार्या शुभांगी ठमके

राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती मातोश्री रमाई आंबेडकर व संत सेवालाल जयंती सोहळा




किनवट, ता. 17 फेब्रुवारी 2020 : 
राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व त्यागमूर्ती मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या समाजोन्नतीच्या कर्तृत्वातील अन्यायाची चिड, पती -पत्नीमधील निष्ठा व कर्मकांडास विरोध या मुद्यांवर समाजातील प्रत्येक घटकांनी आपापली भूमिका जबाबदारीने पार पाडल्यास निश्चितच मानसिकदृष्ट्या निरोगी समाज निर्माण होईल. असे प्रतिपादन प्राचार्या शुभांगी ठमके यांनी केले.

          क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले विचार मंचच्यावतीने गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित केलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,त्यागमूर्ती मातोश्री रमाई आंबेडकर व संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्षा उषा पाटील, माहूरच्या नगराध्यक्षा शितल मेघराज जाधव, वैशाली कदम, सुकेशिनी कपाटे, गंगासागर शिंदे, स्वाती राठोड ह्या प्रमुख अतिथी उपस्थित होत्या.
      याप्रसंगी जिल्हा वैभव पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते अभियंता प्रशांत ठमके, प्राचार्य राजाराम वाघमारे आदिंसह पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

          जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्षा उषा पाटील आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, ' जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी, ' असे म्हणण्यापेक्षा ' जिच्या हाती शिक्षण, राजसत्ता, ती जगाचा उद्धार करी ' असे म्हटले पाहिजे.जर छत्रपती शिवराय पुन्हा जन्माला यायचे असतील तर घराघरात जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे. स्त्री ही तेव्हाच यशस्वी ठरेल, जेव्हा ती स्वतःच्या कुटूंबांना सांभाळत कार्य करेल. '

          प्रारंभी शीला सेलूकर यांनी वंदना पाटील रचित स्वागत गीत गाईले. वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्वानंदी सचिन राठोड, रोहिणी सुरेश तुमलवाड, वैष्णवी साईदास सुद्दलवाड, वैष्णवी नामदेव कुंभार व स्पर्धा परिक्षक वैशाली कदम व किशोर चव्हाण यांनी  मनोगत व्यक्त केले. स्वाती ठमके, झेबा शेख यांनी पाहुण्यांचा परिचय दिला.सीमासाळवे यांनी प्रास्ताविक व किर्तीका भंडारे यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी अलोने यांनी आभार मानले.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मायावती सर्पे, नंदा नगारे,मनीषा चौधरी, वैशाली साबळे आदि शिक्षिकांनी परिश्रम घेतले.


" दुःख हीच शक्ती स्वाभीमान ढळू न देणारी, दुःखाच्या सागरात राहून तप्त सूर्याला घडवणारी ती रमाई, या त्याग मूर्तीचा आदर्श सर्व स्त्रीयांनी घ्यावा.
-ज्योती कदम, सचिव, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले विचारमंच, गोकुंदा
          

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News