नांदेड :
भोकर तालुक्यातील मौजे नागापूर येथे शनिवार दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी आठव्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक दत्ता व्यवहारे यांनी दिली आहे.
सकाळी 9 वाजता धम्म ध्वजारोहन होणार आहे. यावेळी माजी पोलीस पाटील गंगाधरराव शानोमवाड, विद्यमान पोलीस पाटील शानोमवाड, चेअरमन रुख्माजी बेरदेवाड यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर शांती संदेश यात्रा निघणार आहे. सकाळी साडेदहा वाजता पूज्य भन्ते जीवक, पुज्य भन्ते गौतमरत्न व पुज्य भन्ते संघरत्न यांच्या उपस्थितीत धम्म परिषदेचे उद्घाटन होऊन धम्म देशना होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रसिध्द विचारवंत प्रा.डॉ. गणेश शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार एल.ए. हिरे हे या सभेचे स्वागताध्यक्ष राहणार आहेत. यावेळी अरुण आळणे व करुणा आळणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलिंद व्यवहारे व बी.एस. सरोदे हे करणार आहेत. दुपारी दोन वाजता यश मार्केटिंगचे गंगाधर व्यवहारे यांच्या वतीने भोजनदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
रात्री 9 वाजता सुप्रसिध्द गायिका नंदा नांदिकर मुंबई व सुप्रसिध्द गायक कवाल प्रकाशबाबु कळमकर यांचा बुध्द भिम गितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. प्रबोधनकार साहेबराव येरेकार यांच्या अध्यक्षतेखाली या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष सरपंच बालाजीराव शामोनवाड, माजी सरपंच बालाजीराव अल्लेवाड, उपसरपंच राजू पाटील शानोमवाड, सखाराम धात्रक व वामनराव पर्वत आदींची उपस्थिती राहणार आहे.
बौध्द धम्म परिषदेला कृषी व पशुसवंर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, नागनाथ घिसेवाड, शिवाजी पाटील किन्हाळकर, नामदेव आवलवाड, गोविंदराव उल्लेवाड, पंचायत समितीचे सभापती निता रावलोड, उपसभापती नागोराव कोठूळे, डॉ. साईनाथ वाघमारे, डॉ. सागर जाधव, भिमराव दुधारे, नगरसेवक मनोज गिमेकर, बातमीदार बाबुराव पाटील, दीपक सोनकांबळे आदींची उपस्थिती राहणार आहे. तरी या धम्म परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक दत्ता व्यवहारे, संयोजक उत्तम डुम्मेराव, संजय कसबे, स्वागतेच्छुक मनोज रिंगनमोडे, गंगाधर कसबे, प्रकाश सर्पे, महिला आघाडी, युवा आघाडी व नागापूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.




No comments:
Post a Comment