अज्ञान सारते विज्ञान -रमेश मुनेश्वर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, February 28, 2020

अज्ञान सारते विज्ञान -रमेश मुनेश्वर




राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त कवी रमेश मुनेश्वर यांची कविता
-संपादक

अज्ञान सारते विज्ञान


असे कसे ? तसे कसे ?
मुलांच्या मनी प्रश्न असे !
ज्ञानाने अज्ञान जाऊनी
उकल विज्ञानाने होतसे .

आकाशगंगेत ग्रह तारे
खुणवित असे आम्हां सारे ,
चंद्र स्वारी झाली आता
मंगळावरी देऊ पहारे .

का ? केव्हा ? कोठे ? कसे ?
अनेक प्रश्नांची ही जाळे ,
हसतखेळत प्रयोगांतूनी
माहिती नवीनवी मिळे .

पृथ्वीची ही सृष्टी न्यारी
ओढूनी शालू हिरवा नारी ,
ग्लोबल वार्मिंग प्रदुषनातुनी
कशी जपावी दुनिया प्यारी ? 

रक्षण करण्या मायभूचे
यंत्र तंत्रज्ञान माहितीचे ,
मुले - मुली भेदभाव कशाचे ? |
सारे आधारस्तंभ उद्याचे !

कल्पनाची भरारी घेऊनी
अंतराळवीर होऊया ,
अज्ञान सारते विज्ञान म्हणूनी
दृष्टिकोन तयाचा ठेवूया .

-रमेश मुनेश्वर,
( राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त ),
किनवट ( नांदेड )
संपर्क : ७५८८४२४७३५

साभार : किशोर (फेब्रुवारी २०१६ )

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News